शैक्षणिक
धानय्या कौटगीमठ ७९ वी परीक्षा उत्तीर्ण !

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक व तोळनूर गावचे रहिवासी धानय्या गुरूलिंगय्या कौटगीमठ यांनी ७९ वी परीक्षा उत्तीर्ण झाले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड , नई दिल्ली यांच्या मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी टी ई टी) परीक्षा १४ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आला होता आणि या परीक्षेची निकाल आज दिनांक ९ जानेवारी२०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. पेपर १ मध्ये १५० पैकी ९६ गुण घेऊन ६४% टक्क्यांनी आणि पेपर २ समाजशास्त्र विषयात १५० पैकी ९५ गुण घेऊन ६३.३३ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. सलगपणे ७९ वी परीक्षा म्हणजे देशातील वेगवेगळ्या राज्यातील सेट परीक्षा ,नेट परीक्षा आणि विविध राज्यातील टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होत विश्व विक्रम केले आहेत. स्वतःला मिळालेल्या ज्ञानाचा ,अनुभवाचा ,कौशल्याचा इतर विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने सेट नेट टी ई टी परीक्षा साठी मोफत मार्गदर्शन यु ट्यूब द्वारे दर रोज एक तास विद्यार्थ्यांना देत आहेत.विषय करून मराठी ,कन्नड आणि इंग्रजी भाषेतून मार्गदर्शन देत आहेत.नुकसान ४ जानेवारी २०२५ ला कर्नाटक सेट परीक्षा निकाल लागले त्यात १५४ विद्यार्थी के सेट परीक्षा उत्तीर्ण झालेत. गेल्या चार वर्षात धानय्या सरांच्या मार्गदर्शनखाली एकूण ९५८ विद्यार्थी सेट नेट टी ई टी उत्तीर्ण झाले आहेत.३८ ,०८० विद्यार्थी यु ट्यूब ला जॉईन आहेत . एकूण ९०५ व्हिडीओ बनविले आहेत आणि ३०,लाख ०२ हजार,२२४ व्याख्यान विव्हस झाले आहेत. के एल ई मंगरुळे प्रशालेच्य मुख्याध्यापक नंदाजी कदम ,उपमुख्याध्यापक मल्लिनाथ पाटील आणि पर्यवेक्षिका आरती तोळनुरे आणि सर्व शिक्षक विद्यार्थी ,कर्मचारी , पालक वर्ग अभिनंदन केले.