सामाजिक

हजरत शेख   नुरद्दीन  बाबा चिस्ती दर्गा ऊर्स निमित्त एन एस  सोशल ग्रुप तर्फे गोरगरीब , वंचित महिलांना धान्य वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील थोर सुफी संत सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणारे हजरत शेख   नुरद्दीन  बाबा चिस्ती दर्गा ऊर्स निमित्त एन एस  सोशल ग्रुप तर्फे गोरगरीब , वंचित महिलांना धान्य वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम हा दिनांक १२ ऑगस्ट रोजी खासबाग गल्लीतील डॉ.एपीजे अब्दुल कलाम चौक येथे घेण्यात आला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले , माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर , ननू कोरबू आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे , नितीन महाराज पुजारी , समाजसेवक तम्मा  शेळके , सोलापुर येथील बी एस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाबा सालार ,एबीएस ग्रुप संस्थापक अध्यक्ष अब्दुल शेख ,अफसर शेख , आर वन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रियाज हुंडेकरी , एन एस सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नुरद्दीन शेख , उपाध्यक्ष मजहर नीटोरे ,आधारस्तंभ शब्बीर शेख , मेहबूब पालंडे , अरबाज शेख , नाविद डांगे महबूब मुल्ला मोट्याळ , अतिक बागवान , शिवराज स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शंभरहून अधिक गोरगरीब वंचित महिलांना तांदूळ व गहू धान्य वाटप करण्यात आले .प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार एन एस सोशल ग्रुपचे अध्यक्ष नुरद्दीन शेख उपाध्यक्ष मजहर निटोरे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास सद्दाम शेख, नुरदिन जिगररानी, रमजान शेख , फिरोज शेख ,बुडन पटेल , सोहेल नीटोरे ,यासीन शेख , जुबेर कमलीवाले , अझहर हिप्परगी , आजम सुतार , एजाज सुतार , शब्बीर बंदेनवाज , भीमाप्पा आयगोळे , इब्राहिम हिप्परगी , अबू शेख , नुरद्दीन खलिफा ,समर्थ मडिखांबे , सागर बनसोडे आदींसह एन एस सोशल ग्रुपचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button