सामाजिक
बुद्धवासी राधाबाई भिमराव माने यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न

जय मातृ भूमी मित्र मंडळ व समस्त विद्यानगर मित्रपरिवाराकडून आयोजन
सोलापूर ( देवीदास माने )
बुद्धवासी राधाबाई भिमराव माने यांच्या स्मरणार्थ वर्षे 3 रक्तदान शिबीराचे आयोजन विद्यानगर शेळगी सोलापूर येथिल जय मातृभूमी मित्र मंडळ व समस्त विद्यानगर मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९०. रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी उत्सव अध्यक्ष …रोहित हिप्परगे , अभिजित पोतदार, राकेश हिरेमठ, अथर्व बबलेश्वर, वेदांत जोशी, आशिष राठोड, कृष्णा सरवदे, शंकर उपिन, संतोष सुतार, समर्थ माने,विजय माने, मुंबई पोलीस रविंद्र माने, पत्रकार देविदास माने, गणेश तांदळे, विष्णुवर्धन शेकदार, प्रमोद लवटे, बिरूदेव लवटे,तसेच मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
