Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबंधनात !

Admin by Admin
May 23, 2025
in सामाजिक
0
शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबंधनात !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून सामुदायिक विवाह सोहळ्याचे दिनांक २० मे रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर सामाजिक संस्थेकडून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावेळी १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संदीप मडीखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या सामुदायिक विवाह सोहळ्यास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले शिवसेनेचे अध्यक्ष संजय देशमुख माजी नगरसेवक उत्तम गायकवाड , दातापीर बाबा, शिलामणी बनसोडे , तुकाराम दुपारगुडे आदीसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. संस्थेतर्फे वधू वरांना मणी मंगळसूत्र , जोडवे , साडी , शालू ,संसार उपयोगी भांडी , खाट ,गादी ,कपाट आदी वस्तू देण्यात आल्या. दरम्यान प्रारंभी अक्कलकोट शहरातून वधू-वरांची सायंकाळी वरात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मंगल परिणय विधी पार पडला. आतापर्यंत संस्थेकडून सात वर्षात १२९ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्याचा विधी बौद्धाचार्य मरेपा शिवशरण यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप मडीखांबे विवाह सोहळा समिती अध्यक्ष विकास गायकवाड , विनोद थोरे ,सुधीर सोनकांबळे , जयकुमार सोनकांबळे , रुपेश नडगम श्रीशैल कारागीर, गंगाराम गायकवाड , मोहन बनसोडे , बसवराज गायकवाड , प्रथमेश दुपारगुडे महादेव बनसोडे आदीं सह शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेचे पदाधिकारी वधू  वरांकडील पाहुणे मंडळी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

माथाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी मुंबई येथे लाक्षणिक उपोषण सत्याग्रह आंदोलन संपन्न : – ॲड. राहुल सावंत

Next Post

सोलापूरची विमानसेवा, रेल्वे आणि पाणी या प्रश्नावर लक्ष वेधत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे…

Admin

Admin

Next Post
सोलापूरची विमानसेवा, रेल्वे आणि पाणी या प्रश्नावर लक्ष वेधत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे…

सोलापूरची विमानसेवा, रेल्वे आणि पाणी या प्रश्नावर लक्ष वेधत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697