सामाजिक
अक्कलकोट शहरातील शाही ईदगाह मैदानावर ईद-उल फित्र अर्थात रमजान ईदची सामुदायिक नमाज पठण.

अक्कलकोट ( प्रतिनिधी)
अक्कलकोट शहरातील शाही ईदगाह मैदानावर अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांनी ईद -उल फित्र अर्थात रमजान ईदची सामुदायिक नमाज पठण करत मोठ्या उत्साहाने ईद साजरी केली.
नमाज पठण साठी सकाळी ८ :३० ला तमाम मुस्लिम बांधव ईदगाह मैदानात हजेरी लावत,ईदगाह येथे सामुदायिक नमाज पठण केली.
अक्कलकोट ईदगाह कमिटी कडून नमाज पठण करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना नमाज पटनासाठी उत्तम चटाया अंथरण्यात आले होते,
या वेळी मौलवी साहेब यांनी आपल्या भाषणात(खुतबा)मध्ये सांगितले कि मुस्लिम तरुणांनी जुगार, मावा,गुटखा, दारू तसेच सोशल मीडियावरील असे कोणतेही पोस्ट,स्टेटस, रिलस शेअर फॉरवर्ड करू नका ज्यामुळे ज्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अश्या गोष्टी पासून दूर रहावे.
व आपल्या आई वडिलांची सेवा करावे, व आपआपसात प्रेम आणि भाईचारा प्रस्थापित करा असे यावेळी सांगितले.
एकमेकांनी प्रेमाने राहून या देशात शांतता व भाईचारा आबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.
शेवटी मौलवी साहेब यांनी ईदच्या या पवित्र दिवशी आपल्या देशातील सामाजिक सलोखा, बंधुभाव, एकमेकांच्या धर्माबद्दल प्रेम,अधिकाधिक वृद्धिगत व्हावा.
आपल्या देशा मध्ये भाईचारा व विश्वशांतीसाठी अशी अल्लाकडे खास दुआ प्रार्थना करण्यात आली.
ईदऊल फितर अर्थात रमजान ईदची नमाज पठण झाल्यावर शाही ईदगाह येथे विविध राजकीय व सामाजिक नेते मंडळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
या वेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,अशपाक बळोरगी,रईस टिनवाला, महेश हिंडोळे, दिलिप सिद्धे,शिवकुमार स्वामी,यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच अक्कलकोट पोलिस प्रशासनाकडून शाही ईदगाह मैदानावर ईद-उल फित्र अर्थात रमजान ईदची नमाज पठण झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांचे व लहान मुलांना उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार ,पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.