Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे सलग अकराव्या वर्षी आयोजन ; ३० एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा

Admin by Admin
March 12, 2025
in सामाजिक
0
श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे सलग अकराव्या वर्षी आयोजन ; ३० एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )  : जेऊर ता.अक्कलकोट येथे श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने  बुधवार ता. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा ४५ मि . वाजता अक्कलकोट रोडवरील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन जेऊर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.यावेळी गरजू विवाह इच्छुक जोडप्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली आहे.यावेळी काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी,माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, शिवानंद शिवयोगी महास्वामी,बसवलिंग महास्वामी,शिवयोगी शिवाचार्य महास्वामी,निळकंठ शिवाचार्य महास्वामी,श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी,राजशेखर शिवाचार्य महास्वामी,मळेंद्र महास्वामी,शांतलींग शिवाचार्य महास्वामी,अभिनव शिवलिंग महास्वामी,शांतलींग शिवाचार्य महास्वामी,प्रभूषांत महास्वामी,महानंदा ताई मुगळी,सोमलिंग घुळी महाराज,सद्गुरू पांडुरंग महाराज,वीर शिवालिंगेश्वर महास्वामी,रऊफ पिरजादे बाबा आदी मठाधिश उपस्थित राहणार आहेत. याचवेळी अक्कलकोट तालुक्यातील संघर्षावर मात करीत आपले कुटुंब सावरून सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिलेल्या कर्तृत्ववान भगिनींचा सन्मान करून त्यांना आणखी काम करण्यास प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवण्यात आला आहे.ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे आर्थिक अडचण तसेच वाढत चाललेली प्रचंड महागाई यामुळे नागरिकांना आपल्या मुलामुलींची लग्ने लावणे आणि त्याची जबाबदारी हे खूपच खर्चिक आणि न झेपणारे ठरत आहे.श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व  बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने यंदा जेऊरला कोरोनाकाळ वगळता सलग ११ व्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजीला जात आहे.या संस्थेत एकूण २०० मित्रपरिवार सदस्य एकत्र येऊन तन,मन धनाने योगदान देत आहेत.काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेच्या मल्लिकार्जुन पाटील व मित्रपरिवारांकडून १७५ जोडपे विवाहबद्ध झाली आहेत तर चालू वर्षी आणखी जास्त जोडप्यांचा विवाह त्यात्या धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.दरवर्षी साधारण पन्नास हजार वर्हाडी उपस्थित राहत असतात.यात प्रामुख्याने वधू वरांना पोशाख, मणी-मंगळसूत्र,वऱ्हाडी मंडळींना,गावातील मुख्य रस्त्यावरून वधू वरांची मिरवणूक, भोजन,शिदोरी आदींची व्यवस्था केली आहे.या विवाह सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशिलिंग बहुउद्देशीय संस्था तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी जेऊर हे करीत आहेत मंडळी करीत आहेत.इच्छुकांनी काशिनाथ कडगंची (८३०८३५४२०४), इरण्णा कणमुसे  (९४२३७८७२५५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेस मल्लिकार्जुन पाटील,शिवाजीराव कलमदाणे,काशिराया काका पाटील,
इरण्णा कणमुसे, दत्तात्रय कवठे, शिवानंद वाडी,शिवानंद चौलगी, मल्लिनाथ चौलगी, ,अंबाराया कनोजी,सिद्धाराम कापसे,राजकुमार अमोगी, काशिनाथ पाटील,शंकर अजगोंडे, श्रीशैलय्या मसुती, इरण्णा चपळगांव, काशिनाथ कडगंची, शिवराज बोरिकरजगी, सुभाष पाटील आदींची उपस्थिती होती.
Previous Post

बौध्द गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post

नागरिकांच्या पादचारी मार्गावरही अतिक्रमण ,  नगर पालिकेची बघ्याची भुमिका

Admin

Admin

Next Post
नागरिकांच्या पादचारी मार्गावरही अतिक्रमण ,  नगर पालिकेची बघ्याची भुमिका

नागरिकांच्या पादचारी मार्गावरही अतिक्रमण ,  नगर पालिकेची बघ्याची भुमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697