Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बौध्द गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Admin by Admin
March 12, 2025
in सामाजिक
0
बौध्द गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )बौध्द गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन पार पडले. सोलापूर शहरातून वंचित बहुजन आघाडीकडून बुधवार दि. १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धानां ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात; मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी १९९२पासून आंदोलन होत आहेत. तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. त्यामुळे पाच हिंदू धर्मीय ह्यांचे प्राबल्य असल्याने बौध्द गया येथील महाविहार येथे पंडे आणि ब्राम्हणवादी पुजा आणि कर्मकांड करीत असतात. त्यामुळे ज्या रूढी परंपरा ह्यांना तथागत गौतम बुद्ध ह्यांनी नाकारले तीच कर्मकांड येथे सुरू आहेत.
जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त बौध्द गया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावा अशी  मागणी वंचित आघाडीकडून करण्यात आली. याकरीता सदर आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर ह्यांचे पुढाकाराने तसेच समता सैनिक दल व विविध बौद्ध संघटना यांच्यावतीने  आज दि. १२ मार्च २०२५ रोजी देशभरातील बौद्धांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संयुक्तरित्या आंदोलन करण्यात आले.
महाबोधी महाविहार (बोधगया, बिहार) हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून, बोधगया महाविहार कायदा १९४९ चा अन्यायकारक कायदा रद्द करावा. ,बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. ,  
  जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आल्या.
 या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे , वंचित चे शहराध्यक्ष प्रशांत गोळेवार, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहर महासचिव विनोद इंगळे , कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज आरकराव , आतिश बनसोडे , विक्रांत गायकवाड सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post

स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक – पै. पृथ्वीराज मोहोळ 

Next Post

श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे सलग अकराव्या वर्षी आयोजन ; ३० एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा

Admin

Admin

Next Post
श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे सलग अकराव्या वर्षी आयोजन ; ३० एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा

श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे सलग अकराव्या वर्षी आयोजन ; ३० एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156964
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697