Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रासकम.संघटनेचे राज्य सरचिटणीस काटकर यांचा पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव धुडकावला.!

Admin by Admin
January 12, 2025
in सामाजिक
0
रासकम.संघटनेचे राज्य सरचिटणीस काटकर यांचा पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव धुडकावला.!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर: ( रमेश सुरवसे )- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर हे शुक्रवार दि.10/01/2025 रोजी मुंबईहून सोलापुरच्या जुन्या पदाधिकाऱ्यासोबत तडजोड करून समझोता करण्यासाठी विशेष दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन सरचिटणीस यांना दि.30/01/ 2024 रोजी दिलेल्या पत्रातील मार्गदर्शक सूचनानुसार तसेच घटना व नियमातील तरतुदीप्रमाणे जिल्हा शाखा सोलापुरच्या संघटनेची दि.29 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे लिखित निर्देश दिलेले होते.त्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आमसभा न घेताच जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा विरोध धुडकावित निवडणूक प्रक्रिया जबरदस्तीने लादून घेतली होती.त्यावेळी वरील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारीही केलेल्या होत्या.यानंतर बेकायदेशीर व नियमबाह्य झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विजयकुमार भांगे, (आयटीआय विभाग ), सी.एस.स्वामी,( मलेरिया विभाग ), राजाभाऊ सोनकांबळे, ( शिक्षण विभाग ), बाळकृष्ण पुतळे,(आयटीआय विभाग ), सटवाजी होटकर (आयटीआय विभाग ), भिमराव लोखंडे ( जिल्हा कोषागार विभाग.), हुसेनबाशा मुजावर ( आरोग्य विभाग ), नामदेवराव थोरात (जिल्हा कोषागार विभाग ), प्रकाश चव्हाण (रा.कामगार विमा रुग्णालय विभाग ), शशिकांत भालेराव (भुजल आणि सर्व्हेक्षण विभाग), प्रभाकर माने (शासकीय वैद्यकीय कॉलेज ), अशा जवळजवळ विविध खातेनिहाय संघटनेच्या जुन्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अप्पर कामगार आयुक्त, मुंबई, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्याकडे दि.26/06/2024 रोजी सामूहिकरित्या रीतसर तक्रार दाखल केलेली असून या तक्रारीची सुनावणी 4-5 वेळा झालेली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अधिकृतरित्या सभासद असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना या निवडणुकीत झालेल्या मतदानापासून वंचित ठेवलेले होते.(वर्ग-3) तृतीयश्रेणी वर्गातील कर्मचारी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे सभासद म्हणुन मतदार यादीमध्ये नांवे जाणुन बुजून वगळण्यात आलेली असुन त्यामध्ये (वर्ग 4) वर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नांवे मिसळलेली आहेत. आणि त्यांची तसेच संघटनेचे अधिकृत सदस्य ही नसलेल्यां कर्मचाऱ्यांची मतदार यादीत नांवे समाविष्ट केलेली आहेत.या आणि इतर अनेक महत्वाच्या कारणामुळे अप्पर कामगार आयुक्त, बांद्रा मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली असुन त्याचा अंतिम निर्णय येत्या 22/01/2025 रोजी देण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर यांना अप्पर कामगार आयुक्त, म.राज्य मुंबई यांनी सामंजशाने तडजोड करून समझोता करण्याचे सुचक सुनावणीच्या दरम्यान सुचविले होते.त्यामुळे ते जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधुन सामंजशाने तडजोड करून एकोपा करण्यासाठी खातेनिहाय संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृह सोलापूर, येथे जाहीर बैठक घेतली.या बैठकीमध्ये मुळ तक्रारदार राजाभाऊ सोनकांबळे आणि बाळकृष्ण पुतळे यांनी रासकम.संघटनेमधील मूळ जुन्या पदाधिकाऱ्यांना 50 – 50 टक्के प्रमाणे समसमान अशा चार पदांमध्ये विभागणी करण्याच्या मागणीचा प्रस्ताव राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्यासमोर मांडलेला होता. यावर काटकर यांनी संघटनेतील आपल्या जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना आत्ताच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीमध्ये कांही पदे देऊन सामावून घेऊ असा प्रस्ताव मांडले.आपण आपल्या 4 पदाधिकाऱ्यांच्या नावाची यादी दिल्यास त्यातील फक्त जिल्हा कार्यकारिणीतील पदासाठी दोन पदे आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवरील असलेले एक पद असे एकूण 3 पदे देण्याचा विश्वास काटकर यांनी जाहीपणे प्रस्ताव मांडलेला.परंतु सदरचा हा प्रस्ताव विविध अनेक खातेनिहाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर अन्यायकारक असून रासकम.संघटनेमधील एकुण 25 ते 27 विविध खातेनिहाय संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना समसमान पदांच्या न्यायापासून वंचित राहणार आहेत.अशा पदाधिकाऱ्यांना समझोत्याने मार्ग काढत न्याय देण्याऐवजी त्यांचे हक्क व अधिकार हिसकावून घेण्याचा दृष्ट हेतुने कुटील प्रयत्न असल्यामुळे राजाभाऊ सोनकांबळे आणि बाळकृष्ण पुतळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने बहुउद्देशीय सभागृहामध्येच हा एकतर्फी सुचविलेला प्रस्ताव अमान्य करत धुडकावून लावला.तसेच विविध खात्याच्या अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत सभागृहाबाहेर पडले. राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर हे संघटनेच्या मुळ मुद्याच्या विषयाला बगल दिले. वास्तविक पाहता सभागृहामध्ये सभा घेण्याअगोद जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये तडजोड करून समेट घडविल्यानंतर घडलेला समझोता व त्यात झालेल्या वाटाघाटी हे जाहीर सभेमध्ये सांगणे अपेक्षित असताना त्यांनी उलटा प्रवास करत पहिली सभा घेतली आणि सभा संपल्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांची त्यांच सभागृहात समझोत्त्यावर बैठक घेतल्यामुळे अनेक जुने निष्ठावंत पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.यांत रासकम.संघटनेच्या जिल्हा शाखा सोलापूरचे विजयकुमार भांगे, राजाभाऊ सोनकांबळे, सी.एस.स्वामी, बाळकृष्ण पुतळे, हुसेनबाशा मुजावर, सटवाजी होटकर, गोपाल यरगल, कुलदीप गवळी, आर जे शिंदे, वैशाली जेधे मॅडम, शिरीष शेळके, शशिकांत भालेराव, शिवानंद चडचण, प्रकाश चव्हाण, नामदेवराव थोरात, आरिफ रंगरेज, बसवराज मोटे , सुनील बोलाबत्तीन, आरिफ रंगरेज, मशाक पटेल, प्रभाकर होनकळस, रघुनाथ बनसोडे, चंद्रकांत चलवादी या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह विविध खातेनिहाय संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व सदस्य होते.

Previous Post

सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुर ताल महोत्सव संपन्न

Next Post

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी  बाळासाहेब नरारे

Admin

Admin

Next Post
राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी  बाळासाहेब नरारे

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी  बाळासाहेब नरारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697