सामाजिक
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पत्रकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे संचालक ,रिझर्व बँकेचें सेवानिवृत्त अधिकारी दिलीप कदम , भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे , कार्याध्यक्ष श्रीशैल शिवशरण , प्रवक्ते राजकुमार बनसोडे , संघटक सिद्धाराम घटकाबळे आकाश गायकवाड मल्लिकार्जुन भणगे शिवशंकर गुंजले आदींची उपस्थिती होती .यावेळी पत्रकार नंदकुमार जगदाळे , मारुती बावडे , स्वामीराव गायकवाड , रमेश भंडारे , सैदप्पा इंगळे आदी पत्रकारांचा पुष्पगुच्छ पिन शाल श्रीफळ डायरी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकार राजेश जगताप यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे संचालक दिलीप कांबळे मेजर कमलाकर कांबळे मारुती बावडे स्वामीराव गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले..या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.