सोलापूर ( प्रतिनिधी )जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांसाठी ७ दिवसाचे बाल विकास शिबिर राबविण्यात आले.
या ७ दिवसाच्या शिबिरात शिक्षण, बौद्धिक क्षमता चाचणी, रंगभरण स्पर्धा, बाल संस्कार वर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण ५० मुलांनी सहभाग घेतला.
जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात समर्पण उपक्रमांतर्गत हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स चे एम बी ए च्या प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला, या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे कामगार वस्ती किंवा झोपडपट्टी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आले.
. प्रज्ञा कुमठेकर यांनी बाल संस्काराचे शिकवण दिले तर गणित, इंग्लिश, मराठी, एबीए च्या विद्यार्थ्यांनी शिकवण दिले.अशोक चौक येथील सुभाष झोपडपट्टी येथे हनुमान मंदिर परिसरात ही कार्यशाळा घेण्यात आले, या शिबिरात मुलांना शैक्षणीक साहित्य, लागणारे वस्तू, इतर बाबी व शिबिरात सहभागी मुलांना व पालकांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आले होते. तसेच मुलांना पास्ता व शेवया चे पाकीट भेट देण्याची व्यवस्था सतीश सुरेश तमशेट्टी यांच्या तर्फे करण्यात आले होते.
हिराचंद नेमचंद कॉलेज चे विद्यार्थी प्रमुख श्रेया द्यावरशेट्टी व सदस्य सुरज बुबने ,सृष्टी द्यावरशेट्टी
श्रेया काडगी ,सोनाली केदारी,शुभम शिरशाद
यांच्या सहभागातून ७ दिवसीय शिबीर राबविण्यात आले.जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतीश सुरेश तमशेट्टी, मनाली तमशेट्टी, अंजली वलसा, अनिकेत सरवदे, शेखर तमशेट्टी, रोहित गदगे, दर्शन जाथर, बालाजी विटकर, रितेश नागुल, व मार्गदर्शक माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी यांचे सहकार्य लाभले.




