Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर

Admin by Admin
December 12, 2024
in सामाजिक
0
पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( सय्यद अजिम नरसीकर )

पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार, जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली युवा पत्रकार शेख असलम यांच्या नेतृत्वाखालील देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. हा कार्यक्रम देगलूर येथील विश्रामगृहात पार पडला.
तालुकाध्यक्ष यांनी केवळ चार-पाच दिवसांत कार्यकारिणीची स्थापना केली. त्यांच्या या प्रयत्नांची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.
जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे, जिल्हा संघटक मोहम्मद रफिक, सोशल मीडिया उपाध्यक्ष आशिष कृष्णुरकर, आणि ॲडोकेट सुनिल नागोरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात संघटनेचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
देगलूर तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष: शेख असलम, उपाध्यक्ष: अमित पाटील, सचिव: मिलिंद वाघमारे, कार्याध्यक्ष: धनाजी देशमुख, सल्लागार: ॲड. काझी परवेज, कोषाध्यक्ष: काझी तौहीत, संघटक: गजानन टेकाळे, सहसचिव: मनोज बिरादार, प्रसिद्धीप्रमुख: धनाजी जोशी, सहकोषाध्यक्ष: गजानन शिंदे, सदस्य: किरण सोनकांबळे, उबेद हबीब आदींची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड म्हणाले की, “नवी कार्यकारिणी देगलूर तालुक्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावेल.”
कार्यक्रमात प्रस्ताविक भाषण करताना शेख असलम यांनी संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, आणि जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांचे आभार मानले. त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त करत, पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी संघर्ष करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मिलिंद वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष तौहीत काझी यांनी मानले.
कार्यक्रमाचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला आणि पत्रकार संरक्षण समितीच्या पुढील वाटचालीसाठी अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या..

Previous Post

बायकोला माझ्यासोबत का पाठवत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने केला सासूचा धार धार शस्त्राने केला खून..

Next Post

सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन 

Admin

Admin

Next Post
सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन 

सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697