Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि विकास कामांच्या बळावर सचिन कल्याणशेट्टी दुसऱ्यांदा आमदार !

Admin by Admin
November 25, 2024
in राजकीय
0
लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि विकास कामांच्या बळावर सचिन कल्याणशेट्टी दुसऱ्यांदा आमदार !

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) २५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हा बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत लागला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदारांनी प्रचंड मताधिक्याने विजयी केले. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि विकास कामांच्या बळावर सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा आमदार झाल्याचे दिसत आहे .काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात लढत झाली. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख ८३ हजार ४७९ मतदार होते. यामध्ये विधानसभेसाठी दोन लाख ५५ हजार २६ इतके मतदान झाले .यामध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना एक लाख ४८ हजार १०५ तर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना ९८ हजार ५३३ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांना ३७९० मते मिळाली. भाजपाचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना ४९ हजार ५७२ इतके मताधिक्य मिळाले. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सचिन कल्याणशेट्टी यांना ३७ हजार मताचे मताधिक्य होते. या निवडणुकीत तो रेकॉर्ड स्वतः आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तोडून त्यांच्या मताधिक्यात प्रचंड वाढ झाली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गेल्या अडीच वर्षात प्रचंड अशी विकास कामे केली आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ग्रामीण भागातील विकास कामांना प्राधान्य दिल्याचे मताधिक्यावरून दिसत आहे. मतमोजणीच्या २६ फेऱ्यांमध्ये त्यांना सर्वत्र मताधिक्य मिळाले आहे. यावरून ग्रामीण भागातील जनतेने त्यांना भरभरून मतरूपी आशीर्वाद दिले आहेत .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावांना विकास निधी दिला. रस्ते विकास ,पिण्याच्या पाणी योजनेस निधी ,विविध देवस्थानाच्या विकासासाठी निधी , पायाभूत सुविधांसाठी निधी , अक्कलकोट शहरातील बस स्थानकास २९ कोटी रुपयांचा निधी , अक्कलकोट शहरातील पाणीपुरवठ्यासाठी ७२ कोटी रुपयांचा निधी असा अनेक निधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्याचे फलित म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदारांनी भरघोस मतदान करत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांना मतदारांनी पसंती दिल्याचे दिसत आहे .तसेच राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत महिला मतदारांना दिलेली आर्थिक मदत ही परिणामकारक ठरली आहे. अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना महिला मतदारांनी भरभरून मतदान केल्याचे दिसत आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मिळाला आहे. विकास कामे आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या बळावर दुसऱ्यांदा सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोटचे आमदार झाले. अक्कलकोटचे सलग दुसऱ्यांदा आमदार होणारे सचिन कल्याणशेट्टी हे भाजपाचे पहिले नेते ठरले आहेत .काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली फिल्डिंग लावली होती. पण लाडक्या बहिणीच्या समोर त्यांचा निभाव लागला नाही. प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना  मतदारांचा मिळालेला प्रतिसाद मोठा होता. पण तो मतदानात दिसून आला नाही. याचाच फटका काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना बसल्याचे दिसत आहे. पुढील काळात काँग्रेस पक्षाला तालुक्यात उभे राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे.

Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात झळकू लागले आमदार कल्याणशेट्टींचे मंत्रीपदाचे बॅनर !

Next Post

सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? सुभाष देशमुख, विजय देशमुख की सचिन कल्याणशेट्टी !

Admin

Admin

Next Post
सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? सुभाष देशमुख, विजय देशमुख की सचिन कल्याणशेट्टी !

सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? सुभाष देशमुख, विजय देशमुख की सचिन कल्याणशेट्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697