टॉप न्यूज

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात झळकू लागले आमदार कल्याणशेट्टींचे मंत्रीपदाचे बॅनर !

 

 अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. आता त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा मतदारसंघात रंगली असून तसे बॅनर सर्वत्र लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी हे नामदार होणार का याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे. भाजपा महायुतीच्या उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत ४९ हजार ५७२ मताच्या मताधिक्याने काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले. त्यांनी दुसऱ्यांदा माजी मंत्री सिद्धाराम म्हत्रे यांचा पराभव केला. भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा विजय झाल्याने आता त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याकडे संपूर्ण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे व जिल्हयाचे लक्ष लागले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विजयाचे बॅनर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वत्र भावी मंत्री म्हणून झळकत आहेत. सर्वत्र लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनर वर भावी मंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने नव्याने स्थापन होणाऱ्या  मंत्रिमंडळ स्थापनेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची वर्णी लागणार का ? ते आमदारचे नामदार होणार का ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa