Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

थोर समाज सुधारक आणि महापुरुषांचे विचार पदोपदी मार्गदर्शक व्हावेत हाच संस्था नामांतरणाचा हेतू आहे -कुलगुरू प्रकाश महानवर

Admin by Admin
October 17, 2024
in शैक्षणिक
0
थोर समाज सुधारक आणि महापुरुषांचे विचार पदोपदी मार्गदर्शक व्हावेत हाच संस्था नामांतरणाचा हेतू आहे -कुलगुरू प्रकाश महानवर
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( रमेश सुरवसे ) महाराष्ट्रामधील अनेक थोर समाज सुधारक आणि महापुरुषांच्या सामाजिक समतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या सुविचारामुळे पदोपदी मार्गदर्शनपर आदर्श घेत आजच्या युवा पिढीने थोर समतावादी महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक समतेचा आणि एकात्मतेचा समतावादी विचार अंगीकारून सर्व व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करावी, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत असलेल्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग या दोन्हीही तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ आणि तांत्रिक शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक विषयक सामंजस करार होऊन कौशल्य, व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण देण्या – घेण्यासाठी एकमेकांनी शैक्षणिक देवाण-घेवाण करावे.असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार विजापूर रोड, सोलापूर स्थित असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ” महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ” असे नवीन नामांतराच्या नामफलकाचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रकाश महानवर बोलत होते. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच एका शासकीय आदेशाद्वारे राज्य भरातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अनेक महापुरुषांच्या आणि समाज सुधारकांच्या नांवे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देऊन त्या संस्थांचा नामविस्तार करण्याबाबत आदेश जारी केला होता.त्या नुसारच सोलापुरातील विजापूर रोड, सोलापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ” महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ” असे नामांतर करण्याचा कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2-00 वाजता नवीन नामांतरण सोहळा कार्यक्रम प्रशासकीय आवारामध्ये आयोजित करण्यात आला होता. सदरच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे नेते राजाभाऊ सोनकांबळे हे प्रमुख उपस्थितीत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाधिकारी सुरेश भालचिम  यांच्यासह संस्थेचे प्रभारी उप प्राचार्य झणझणे  , संस्थेतील वरिष्ठ शिल्प निदेशक, गट निदेशक, महिला कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थेमधील प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण एल.पुतळे यांनी केले.तर सूत्रसंचालन बी. आर.आसरेड्डी यांनी केले.शेवटी विजयकुमार डी.भांगे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि प्रशिक्षणार्थ्यांचे आभार मानले.

Previous Post

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा – प्रा.गणेश करे-पाटील

Next Post

नागणसूर मठात समर्थ बिराजदार यांचा सत्कार

Admin

Admin

Next Post
नागणसूर मठात समर्थ बिराजदार यांचा सत्कार

नागणसूर मठात समर्थ बिराजदार यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697