Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शाब्दिक वॉर !

Admin by Admin
October 10, 2024
in राजकीय
0
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शाब्दिक वॉर !

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट (स्वामीराव गायकवाड ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप – प्रत्यारोपातून वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खासदार तसेच आजी-माजी आमदार यांच्यात शाब्दिक वॉर सुरू झाले आहे. राजकीय नेत्यांचा शाब्दिक वॉर हा नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे .

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपचे नेते हे उजनीच्या पाण्यावरून एकमेकांना भिडले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात 22 वर्षानंतर नुकतेच उजनी धरणातून पाणी आले आहे. उजनी धरणातून कुरनूर धरणात पाणी आल्याने काँग्रेस पक्षाचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून उजनीचे पाणी आणल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर वेगवेगळी पोस्ट सोडून आपापल्या नेत्याचे समर्थन करत आहेत. यामुळे राजकीय क्षेत्रात उजनीचे पाणी तापले आहे. यातच भारीच भर म्हणून आता राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाले आहे .सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी चपळगाव येथील कृतज्ञता मेळाव्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर टीका करत आमदारांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असे सांगितले होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाच टार्गेट केल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी अभ्यास करून बोलावे अशी टीका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी असा वाद पेटला आहे. यातच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी चपळगाव येथे झालेल्या वचनपूर्ती  कार्यक्रमात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे पोलीस खात्याचा गैरवापर करून विरोधकांवर केस दाखल करीत असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे .याला उत्तर देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी १७ वर्षे सत्तेत असताना मंत्री असताना तुम्ही काय विकास केलात. मी केवळ विकास कामातून उत्तर देत असून ३८३ कोटींचा निधी केवळ ७५ दिवसात आणल्याचे हैद्रा येथील एका कार्यक्रमात सांगितले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात राजकीय शाब्दिक वॉर सुरू झाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्तेही सोशल मीडियावर शाब्दिक टीकाटिप्पणी करून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत असून कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची बाजू कशी चांगली आहे हे सांगण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही चपळगाव येथील कार्यक्रमात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची दादागिरी खपून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन केले आहे .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना अभ्यास करून बोलण्याचा सल्ला दिला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांची माहिती वेळोवेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते विकास कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत आहेत. महाविकास आघाडीने पंचायत समितीवर हलगी मोर्चा काढून अक्कलकोट तालुक्यातील रस्ते विकासाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या मोर्चात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काम होत नसतील तर पंचायत समितीला जाळावे का असे स्फोटक  वक्तव्य करून अधिकाऱ्यांना दम दिला होता. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या या वक्तव्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर निषेध केला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध काँग्रेस असा शाब्दिक वॉर सुरू असून भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात विकास कामावरून कलगीतुरा रंगला आहे. आगामी काळात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राजकीय शाब्दिक वॉर अधिक पेटण्याची शक्यता असून उजनीचे पाणी हे राजकीय क्षेत्रात केंद्रस्थानी असणार असे राजकीय जाणकार सांगत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांचा राजकीय शाब्दिक वॉर हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असल्याने वरून कुस्ती आणि आतून दोस्ती असणारे नेतेही सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा हलता देखावा पाहण्यासाठी देवी भक्तांची मोठी गर्दी

Next Post

अक्कलकोट लिंगायत पंचमसाली समाज संघटनेची स्थापना

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट लिंगायत पंचमसाली समाज संघटनेची स्थापना

अक्कलकोट लिंगायत पंचमसाली समाज संघटनेची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697