सामाजिक
हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती साहेबांच्या ऊर्स शरीफला २१ ऑगस्टपासून प्रारंभ

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट येथील महान संत, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती रहि. अल्लेही साहेबांचा वार्षिक ऊर्स शरीफ दि. २१ ऑगस्ट पासून खालील प्रमाणे दिमाखात, भक्ती भावाने साजरा होणार आहे.
दिनांक २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक १० वाजता सदर दर्गाहचे वंशपरंपरागत सज्जादानशीन, धर्मगुरू, मठाधीपती सय्यदशा नसीरपाशा सय्यदशा कदीरपाशा पीरजादे चिस्ती यांचे पवित्र हस्ते गुस्ल (अभिषेक) या धार्मिक विधीने ऊर्ससास सुरुवात होणार आहे.
दिनांक २२ ऑगस्ट रोजी संदलमलिक (गंध) चा कार्यक्रम असून संध्याकाळी ठीक ७ वाजता दर्गाहची परंपरागत गादी दर्गाहच्या समाखानात अंथरून सज्जादानशीन व फकीर फुकरा, भक्तगण यांचेसह संदलची भव्य मिरवणूक रजी अल्लः दर्गाह येथून निघून अक्कलकोट येथील मुख्य रस्त्यावरून दर्गाहवर रात्री १० वाजणेच्या आत पोहचणार आहे. त्यानंतर सदर दर्गाहचे सज्जादानशीन यांचे हस्ते हजरत शेख नुरुद्दीन बाबां यांचे समाधीवर संदल / गंध चढविण्यात येईल व त्यानंतरप्रसाद वाटप होणार आहे.
दिनांक २३ ऑगस्ट रोजी चिराग (दिपोत्सव) चा
कार्यक्रम सदर दर्गाहचे सज्जादानशीन सय्यदशा नसीरपाशा सय्यदशा कदीरपाशा पीरजादे यांचे पवित्र हस्ते होणार आहे. संध्याकाळी दर्गाहवर कव्वालीचा, भजनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०
वाजता जियारतचा कार्यक्रम संपन्न होणार आहे व त्यानंतर सज्जादानशीन यांचे हस्ते प्रसाद वाटप होणार आहे. प्रसाद वाटपानंतर संध्याकाळी दर्गाहची परंपरागत गादी फातेहाखानी नंतर सज्जादानशीन यांचे दर्गाह येथील निवास्थानी नेऊन ठेऊन ऊर्स शरीफची सांगता
होणार आहे.
तरी सर्व हिंदू, मुस्लीम बांधवांनी, भक्तांनी ऊर्सशरीफमध्ये भाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे सदर दर्गाहचे वंशज सज्जादानशीन सय्यदशा नसीरपाशा सय्यदशा कदीरपाशा पीरजादे चिस्ती यांचे बंधू पीरजादे ए. के. विधीज्ञ व ट्रस्टचे अध्यक्ष हाजी
फजलेरहिमान शाब्दी केले आहे.
