Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहर – तालुक्यात अनेक राजकीय नेत्यांकडे बोगस जातीचे दाखले 

Admin by Admin
January 19, 2026
in सामाजिक
0
अक्कलकोट शहर – तालुक्यात अनेक राजकीय नेत्यांकडे बोगस जातीचे दाखले 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहर – तालुक्यात अनेक राजकीय नेत्यांकडे बोगस जातीचे दाखले असल्याच चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक असणाऱ्या राजकीय नेत्यांनी विविध पक्षांकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल केले आहेत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून उमेदवारी अर्ज विक्री सुरू झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अक्कलकोट शहर व तालुक्यातील अनेक मातब्बर राजकीय नेत्यांकडे जातीची बोगस दाखले असल्याचे बोलले जात आहे .अक्कलकोट तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांकडे एस सी , एस टी आणि ओबीसी चे बोगस जातीचे दाखले काढण्यात आले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांनी तात्काळ याची दखल घेऊन अक्कलकोट तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांचे जातीच्या  दाखल्यांची चौकशी करून ज्यांनी बोगस जातीचे दाखले काढले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.अक्कलकोट तालुक्यातील बोगस जातीच्या दाखल्यामुळे जे मूळ लाभार्थी आहेत एससी एसटी तसेच ओबीसी प्रवर्गातील जे मूळ लाभार्थी आहेत त्यांच्यावरती राजकीय , सामाजिक अन्याय होत आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.अक्कलकोट तालुक्यात जातीची बोगस दाखले वाटल्याचे प्रकरण या अगोदर घडले आहे. याबाबत अनेकांवर कारवाई झाली आहे.सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक असणाऱ्या राजकीय नेत्यांकडे ओबीसी ,एससी व एसटी प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले मोठ्या प्रमाणात काढण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यात बोगस जातीचे दाखले देणारी एक सोनेरी टोळी सक्रिय असून याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरली आहे.अक्कलकोट तालुक्यात बोगस जातीचे दाखले देणारी सोनेरी टोळी ही सक्रिय असून या टोळीचा पर्दाफाश  होणे गरजेचे आहे.ज्या नेत्यांकडे बोगस जातीचे दाखले आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून मूळ लाभार्थी मागासवर्गीय लाभार्थी तसेच ओबीसी लाभार्थी यांच्यावर अन्याय होणार नाही याची दखल जिल्हाधिकारी व तहसील प्रशासन यांनी घेणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकात सुरू आहे.

Previous Post

तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासाच्या नव्या कारभाऱ्यांकडून अपेक्षा वाढल्या !

Next Post

पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशन चे घवघवीत यश

Admin

Admin

Next Post
पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशन चे घवघवीत यश

पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशन चे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157250
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697