Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या नारीशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण

Admin by Admin
October 9, 2024
in सामाजिक
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या नारीशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
महिला सर्वच क्षेत्रात सक्षमपणे आघाडीवर : डॉ. कुलकर्णी
सोलापूर ( प्रतिनिधी ): आज महिला सर्व क्षेत्रात सक्षमपणे आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव ही निश्चित सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे.श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्य कामगार विमा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक बालरोगतज्ज्ञ डॉ.आसावरी कुलकर्णी यांनी काढले. 
         श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने  नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर नऊ महिलांना “नारीशक्ती” पुरस्कार वितरण सोहळा आज भवानी पेठ श्रीशैल्य नगर येथील सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलमध्ये थाटात पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, अमरआयु हॉस्पिटलचे डॉ.श्वेता शहा, समाजसेविका माधुरी भुमकर, विवेकानंद पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापिका सपना असावा, परशुराम मोबाईल शाँपीचे प्रमुख रवी नावदगीकर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे हे सहावे वर्षे आहे.
        श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. त्यातून नवे अधिकारी घडतील. त्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन नर्मदा कनकी यांनी केले.
            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश आलंगे, गणेश येळमेली, महेश ढेंगले, मयुर गवते, महेश भाईकट्टी, केशव भैय्या, दिपक करकी, बसवराज पंरचडे, राजेश केकडे, अभिजीत व्हानकळस, जय कबाडे, तुकाराम चाबुकस्वार, सचिन राठोड, सुरेश लकडे, नरेश कनकी, मंल्लेश पुरवंत, अनिता रेळेकर, उमा मुंगड, अक्षता कासट, सुजाता सक्करगी, भारती जवळे, शुभांगी लचके, ज्योती गायकवाड, मनुश्री कासट यांनी परिश्रम घेतले.
 चौकट — यांचा झाला नारीशक्ती पुरस्काराने सन्मान !
उद्योजिका वर्षा पाथरकर, पेनगोंडा कल्याणी फुड्सच्या कल्याणी पेनगोंडा (उद्योग क्षेत्र), सुरेखा झाड (वधु-वर सुचक केंद्र सेवा), शिक्षिका वैशाली अघोर (शैक्षणिक),  डॉ. किर्ती कटारे (वैद्यकीय सेवा), ऍड.शितल डोके (विधी सेवा), बी.आर. न्यूजच्या पत्रकार श्रुती माने – गांधी (पत्रकारिता), नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिविंग एच आय व्ही एड्स या संस्थेच्या प्रकल्प समन्वयीका विजयश्री आमले (सामाजिक सेवा), निवेदिका ऐश्वर्या हिबारे आदी नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Previous Post

महायुती सरकार कडून हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबाबत महामानव डॉ  आंबेडकर यांना वंदन करुन जल्लोष साजरा 

Next Post

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

Admin

Admin

Next Post
दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697