Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

धनगर समाजाचा एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी अक्कलकोट ते सोलापूर या राज्यमहामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Admin by Admin
September 21, 2024
in सामाजिक
0
धनगर समाजाचा एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी अक्कलकोट ते सोलापूर या राज्यमहामार्गावर रास्ता रोको आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्यासाठी येत्या सोमवारी दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. अक्कलकोट येथे अक्कलकोट ते सोलापूर या राज्यमहामार्गावर एम. एस. ई. बी. चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले. यावेळी सुनिल बंडगर, दत्तात्रय माडकर, सुभाष पुजारी, स्वामीराव घोडके, अप्पू चेंडके, सुर्यकांत बाचके, भुताळी वागदरी, विष्णू ठेंगले, हणमंत बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, संतोष फुलारे आदी उपस्थित होते. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की दिनांक ९ सप्टेंबर पासून पंढरपूर येथे पाच धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत. पण सरकार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही. धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करु नये यासाठी २५ आमदार ४ खासदार मिळून सरकारकडे मागणी केली आहे. अदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचे धक्का न लावता धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही सकल धनगर समाजाची मागणी आहे. तरी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात एकदिवसीय रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने अक्कलकोट ते सोलापूर या राज्यमहामार्गावर एम. एस. ई. बी. चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. तरी अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे सकल धनगर समाज बांधव अक्कलकोट तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना गोंजारण्याचे काम सुरू !

Next Post

अक्कलकोट ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

अक्कलकोट ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697