Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आकर्षक आणि सुबक गणेश मुर्त्यानी वेधले लक्ष ! अक्कलकोट शहर तालुक्यात मोठ्या गणेश मुर्त्या बसविण्याकडे वाढला कल !

Admin by Admin
September 14, 2024
in सामाजिक
0
आकर्षक आणि सुबक गणेश मुर्त्यानी वेधले लक्ष ! अक्कलकोट शहर तालुक्यात मोठ्या गणेश मुर्त्या बसविण्याकडे वाढला कल !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )सध्या सर्वत्र गणेशोत्सव भक्तीभावाने सुरू आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यात अनेक श्री गणेशोत्सव तरुण मंडळांनी आकर्षक आणि सुबक गणेश मुर्त्या बसविल्याने या मुर्त्यांकडे गणेश भक्तांसह नागरिकांचे लक्ष वेधले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मंडळांनी मोठ्या गणेश मुर्त्या बसविल्या आहेत.
 अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सार्वजनिक गणेश उत्सव तरुण मंडळांकडून गणेश उत्सवासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. यामध्ये श्री गणेश मुर्त्या या आकर्षक सुबक सुंदर असाव्यात याकडे लक्ष दिले जाते. अनेक गणेश मंडळांकडून हैदराबाद पेण रायगड मुंबई व कर्नाटकातून श्री गणेशाच्या आकर्षक सुबक मुर्त्यांची प्रतिष्ठापना केली आहे .अक्कलकोट शहरासह मैंदर्गी दुधनी व इतर गावांमध्ये मोठ्या गणेश मुर्त्यांची प्रतिष्ठापना विविध मंडळाकडून करण्यात आली आहे. अक्कलकोटातील संयुक्त आजाद हिंद मंडळ ,श्री वीरभद्रेश्वर गणेशोत्सव मंडळ मैंदर्गी , मधला मारुती गणेश मंडळ , महादेव तरुण मंडळ , श्री रिद्धी सिद्धी गणेशोत्सव तरुण मंडळ , आझाद हिंद तरुण मंडळ ,श्री  रामलिंग चौडेश्वरी गणेशोत्सव मंडळ मैंदर्गी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर , श्री बसवेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळ माळी गल्ली , पागाचाळ गणेशोत्सव तरुण मंडळ , श्री नवसाचा मारुती गणेश मंडळ ,श्रीकृष्ण गणेशोत्सव तरुण मंडळ , समाधी मठ गणेशोत्सव मंडळ बुधवार पेठ , राजे फत्तेसिंह चौक गणेशोत्सव मंडळ , क्रांती तरुण मंडळ हनूर चौक ,श्री एकता गणेशोत्सव मित्र मंडळ ,श्री शिव बालाजी तरुण मंडळ बुधवार पेठ आदींसह विविध सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांनी श्री गणेशांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 148 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे तर उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्कलकोट शहरासह 155 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाच्या आकर्षक सुबक लाखो रुपये किमतीच्या श्री गणेश मूर्ती या गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Previous Post

दहिटणे शिवारात  विद्युत करंट लागून शेतकरी  पती पत्नी चा मृत्यू

Next Post

ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे आहे त्यांनी मोबाईलच्या वापरावर मर्यादा ठेवा – करे पाटील

Admin

Admin

Next Post
ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे आहे त्यांनी मोबाईलच्या वापरावर मर्यादा ठेवा – करे पाटील

ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे आहे त्यांनी मोबाईलच्या वापरावर मर्यादा ठेवा – करे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697