सोलापूर

वटवृक्ष छायेखाली स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवले – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )  – 
             येथील श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाच्या छायेने साक्षात स्वामी समर्थांचे वावर अनुभवले आहे. त्यामुळे स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या भाविकांना स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवतात. विश्वशांतीचे प्रतिक असलेले येथील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जगाला सन्मार्ग दाखविणारे गुरूमाऊली आहेत. माझ्यासह त्यांचा आशिर्वाद महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाभत रहाव्यात अशी प्रार्थना स्वामी चरणी आहे. आज या प्रसंगी मलाही समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी समर्थांच्या ब्रीद वाक्याची प्रचिती येऊन येथील वटवृक्षाच्या छायेत स्वामी माऊलींचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे जाणवले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व
मा.नगरसेवक महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 
याप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती नीलमताई गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचाही मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे 
प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी व माझे कुटुंबीय स्वामी समर्थांचे भक्त आहोत. मी मुख्यमंत्री असताना माझे कुटूंबीय स्वामी दर्शनाकरीता येऊन गेलेले आहेत, पण आज प्रत्यक्ष स्वामी समर्थांच्या इच्छेनेच त्यांच्या दर्शनाचा अमृतयोग आला हे माझे परमभाग्य आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे आमचे श्रध्दास्थान आहे. मंदिर समितीकडून मंदीरात करण्यात आलेले गाभारा नुतनीकरण व परिसर सुशोभीकरणामुळे मंदीरातील स्वामी भक्ती व स्वामी दर्शनाच्या प्रसन्नतेची अनुभूती शब्दाने अवर्णनीय असल्याचे सांगून कुटुंबीयांसह पुन्हा एकदा निवांत स्वामी दर्शनास येऊ असे शब्द दिले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती नीलमताई गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी मंत्री तथा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, मंगेश चिवटे, अमोल बापू शिंदे, मा.आमदार ज्ञानराज चौगुले, मोहोळ चे मा.नगराध्यक्ष रमेश बारस्कर, जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे, मनीष काळजे, शंकर म्हेत्रे, तालुका प्रमुख संजय देशमुख, मा.नगरसेवक रामचंद्र समाणे, मंदिर समितीचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, व्यंकटेश पुजारी, सागर गोंडाळ, नागनाथ गुंजले, संतोष जमगे, 
दर्शन घाटगे, आदीत्य गवंडी, प्रसाद सोनार, भिमा मिनगले, अविनाश क्षीरसागर, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button