राजकीय

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे लागले मतदारांचे लक्ष !

दादा की अण्णा चर्चा सर्वत्र सुरू 
अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड )  अक्कलकोट विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ६६.४७ टक्के मतदान झाले आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार याची चर्चा मतदारसंघात रंगली असून आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. दादा की अण्णा याची चर्चा सर्वत्र सुरू असून काही ठिकाणी पैजाही लावण्यात आले आहेत .
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात १२ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस महाविकास आघाडी कडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,भाजपा महायुती तर्फे आमदार सचिन कल्याणशेट्टी रासप चे उमेदवार सुनील बंडगर वंचित बहुजन आघाडी तर्फे संतोषकुमार इंगळे मनसे उमेदवार मल्लिनाथ पाटील प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जमीर शेख बसपा कडून इक्रार शेख अपक्ष उमेदवार पुजा पाटील   अपक्ष शिवनिंगप्पा वंगे . प्रसाद बाबनगरे , अपक्ष ज्ञानोबा साळुंखे,.    अपक्ष सिद्धाराम कोळी  आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी प्रचारासाठी दिवसरात्र एक केला होता. भाजपा , काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी , रासप , मनसेसह सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढला होता. प्रचरासाठी जाहीर सभा पदयात्रा कॉर्नर बैठका  यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजपा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी , काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे वंचित चे उमेदवार संतोष कुमार इंगळे रासपचे उमेदवार सुनील बंडगर मनसे उमेदवार मल्लिनाथ पाटील सह सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क साधून संवाद साधला होता. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण  ६६. ४७ टक्के इतके मतदान झाले आहे. एकूण तीन लाख ८३ हजार ४७९मतदारांपैकी दोन लाख २४ हजार २६२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये एक लाख १३ हजार सतरा पुरुष तर एक लाख ११ हजार २३७ स्त्री मतदार तसेच इतर आठ असे मतदान झाले आहे .पुरुष मतदारांसोबत महिला मतदारानी ही मोठ्या प्रमाणात मतदान केले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावर आता राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून भाजपा व काँग्रेस पक्षाकडून दावे करण्यात येत आहेत. भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार अशी चर्चा भाजपातून व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे हे विजयी होतील अशा भावना काँग्रेस पक्षातील पदाधिकारी नेते यांनी व्यक्त केले आहेत. वंचित बहुजन आघाडी रासप मनसे बसपा प्रहार जनशक्ति पक्षासह अपक्ष उमेदवारांना किती मते मिळणार याचीही चर्चा सुरू आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात वाढलेला मतदानाचा टक्का हा कोणासाठी फायदेशीर ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे .भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा  पाटील यांनी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना पाठिंबा दिल्याने याचा फायदा किती होणार आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे .आता मतदारांचे लक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले असून सचिन दादा की सिद्धाराम अण्णा याची चर्चा मात्र अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात जोरदार रंगली आहे. तसेच ग्रामीण भागात पैजाही लावण्यात येत असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button