सामाजिक
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हैद्रा येथे विविध विकास कामाचें भूमिपुजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी हैद्रा येथील हजरत ख्वाजा सैफुल मुलुख बाबा दर्गा येथे एक कोटी ३४ लाख रुपये विकास कामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये दर्गा परिसरात पार्किंगची सोय पाण्याची टाकी प्लेवर गट्टू बसविणे आदी विकास कामांसाठी एक कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच हैद्रा ग्रामपंचायत मध्ये जलजीवन निधी म्हणून पाणीपुरवठ्यासाठी दीड कोटी रुपये , व्हसुर रोड साठी एक कोटी रुपये असा निधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास युवा नेते मिलन कल्याणशेट्टी, फजल शेठ शाब्दी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,मलकण्णा कोगनूर, सरपंच नागाव्वा तेली ,अप्पू परमशेट्टी,रजाक सय्यद, नन्नू कोरबू, बुडन तांबोळी,शिवराज स्वामी, मल्लिनाथ करपे,विश्वनाथ रेऊर,राजकुमार जिडगी, व्यंकणा महाराज, गौडप्पागौड पाटील, कांतू उप्पीन, गुरुनाथ करुटी, चनमलप्पा करुटी, पिरप्पा करुटी, प्रसाद प्रचंडे, बसलिंगप्पा थंब,सिद्धाराम तोळणूर,बसवराज मंटगी,गिरमल गंगोंडा, रमेश उप्पीन, राजशेखर पाटील, कल्याणी रब्बा,निंगणा पुजारी, प्रदीप जगताप, कमलाकर सोनकांबळे,निजप्पा गायकवाड, धोंडप्पा बनसोडे आकाश माने, प्रकाश पोमाजी,संतोष पोमाजी, सुनील सावंत,जीलानी मुजावर,चंद्रशेखर करुटी, संगप्पा हिरोळी, शिवानंद खेड, श्रीमंत कोगनुर,मधुकर रोडगी, रामचंद्र बिराजदार, श्रीमंत नाद, बसप्पा वाडी, मायप्पा धनगर,महादेव चव्हाण, सुभाष चव्हाण,रफीक नबीसाब मुजावर, चांदपशा एम मुजावर, बंदनवाज बाशासाब मुजावर, सैफन फुलारी, इस्माईल मुजावर, डॉक्टर मुजावर,रवि लोणार,नजीर फरास, हजरत खाजा सैफन मुलूक दर्गाह ट्रस्ट चेअरमन रफिक सिराजुद्दीन मुजावर,व्हा. चेअरमन बंदेनवाज तालाबली मुजावर, ट्रस्ट चे सदस्य अहमद मुजावर, वकील मुजावर, रऊफ मुजावर, बंदेनवाज मुजावर, याकूब मुजावर,जैनोद्दीन मुजावर, अयुब मुजावर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



