सामाजिक
दहिटणे ग्रामपंचायतीमध्ये अंध व्यक्तीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तालुक्यातील दहिटणे ग्रामपंचायतीने २६ जानेवारी रोजी दहिटणे गावाने इतिहासात पहिल्यांदाच आगळावेगळा उपक्रम आयोजित करून गावातील एक जेष्ठ नागरिक जे नेहमी सांप्रदायिक भजन किर्तन क्षेत्रात कार्यरत आहेत. दोन्ही नेत्राने अंध असून सर्वाशी प्रेमाने आपूकिने बोलणारे अंध व्यक्ती चंद्रकांत पावले याच्या हस्ते करून ग्रामपंचायतीने करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अंध व्यक्ती त्याना घरापासून वाजत गाजत आणून ग्रामपंचायतीसमोर त्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक पवार , सरपंच नितीन मोरे उपसरपंच विकीबाबा चौधरी ग्रा प सदस्य शरणू कोळशेट्टी चंद्रकला काबळे अंबुताई कटकधोंड , सागर कांबळे शहनाज मुजावर सत्यवती कोळी , दादा शेख पोलीस पाटील भिम म्हैत्रे तलाठी यशोदा पंगुडवाले , कोतवाल आदी सह ग्रा प शिपाई, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. हा ध्वजारोहण अंध व्यक्तीच्या हस्ते केल्याने सरपंच नितीन मोरे व सर्व सदस्याचे पंचक्रोशीत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.