Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महादेव कोगनुरे यांनी घेतली औज मंद्रूप येथील जळीतग्रस्त कुटुंबियांची भेट

Admin by Admin
August 2, 2024
in टॉप न्यूज
0
महादेव कोगनुरे यांनी घेतली औज मंद्रूप येथील जळीतग्रस्त कुटुंबियांची भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जळीतग्रस्त कुटुंबियांना दिला मदतीचा हात.
दक्षिण सोलापूर ( प्रतिनिधी )
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप येथे  शुक्रवार दि 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सिराज शेख यांच्या घरात शाॅक सर्किट होऊन अचानक आग लागून संपूर्ण घर जळून बेचिराख झाले आहे.यावेळी गावातील तरुण वर्गाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु या तरुणांच्या प्रयत्नाला यश आले नाही.शेवटी सिराज शेख यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले.या आगीत जवळपास लाख दीड लाख किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.या अचानक लागलेल्या आगीमुळे सिराज शेख कुटुंबियांचे संसार सध्या उघड्यावर पडल्याची माहिती एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांना मिळताच एम के फाऊंडेशन चे पदाधिकारी व खुद्द महादेव कोगनुरे यांनी जळीत घटनेची दखल घेत औज येथील जळीतग्रस्त सिराज शेख यांच्या घराला भेट देऊन मदतीचा हात देऊन धीर देत माणूसुकी जपली आहे. महादेव कोगनुरे हे नेहमीच जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून येत असतात. याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा औजकरांना व सिराज शेख कुटुंबियांना आली आहे. सतर्कता दाखवत महादेव कोगनुरे यांनी आज सिराज शेख कुटुंबियांवर दाखवलेल्या माणुसकीचे सध्या सर्वत्र कौतुक होताना पहायला मिळत आहे.
यावेळी बोलताना महादेव कोगनुरे  म्हणाले की,सध्या शेख कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी मदतीची व धीर देण्याची नितांत गरज आहे. जळीतग्रस्त कुटुंबियांची हीच गरज ओळखून मी या ठिकाणी आलो आहे.गेली अनेक वर्षे मी जळीतग्रस्तांचे दु:ख जवळून पाहिले आहे.म्हणूनच आज मी सिराज शेख कुटुंबियांना धीर देण्यासाठी याठिकाणी पोहचल्याचे सांगितले.
या वेळी पोलीस पाटील नागेश उंबरजे,सरपंच विकास केरके, तलाठी नींगु कोळे, कोतवाल भाऊसाहेब गायकवाड, निवृत्त शिक्षक कुंभार सर,इस्माईल शेख, बाबूलाल शेख, प्रथमेश गायकवाड, मल्लिकार्जुन करडे, विठ्ठल गायकवाड, आयुभ मकानदार, सुपुत्र कोरे, प्रथमेश कवडे, चंद्रकांत शेंडगे तसेच प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

वानराच्या धडकेतील पिंपळी धामणगाव येथील व्यक्तींचा मृत्यू

Next Post

परंडा येथे 61 दिव्यांग तपासणी कॅम्प संपन्न

Admin

Admin

Next Post
परंडा येथे 61 दिव्यांग तपासणी कॅम्प संपन्न

परंडा येथे 61 दिव्यांग तपासणी कॅम्प संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697