मुगाव येथील जि. प. प्रा. शाळेत शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मारुती बैलकर तर उपाध्यक्षपदी शिवहार ताटे यांची निवड

नायगाव ( :- सय्यद अजिम नरसीकर ) मुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मारुती तुकाराम बैलकर तर उपाध्यक्षपदी शिवहार शेषराव ताटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.नायगाव तालुक्यातील मुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय शिक्षण समितीची निवड दि.23 जुलै रोजी मंगळवारी. महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष दादाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्र प्रमुख गारटे व मुख्याध्यापक निटुरे सर यांच्या उपस्थितीत करण्यात असून अध्यक्षपदी मारोती बैलकर उपाध्यक्ष पदी शिवहार ताटे सदस्य म्हणून मारोती बैलकर,प्रल्हाद हेंटे,जयश्रीबाई कांबळे ,गोदावरीबाई चिंचोले ,उज्वलाबाई लिंगाडे ,छायाबाई ईबितदार, राधाबाई ठोसणे,भास्कर गाडले,प्रकाश जेठे ,बळीराम ताटे ,संजय गंधकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच प्रतिनिधी सुरेश पाटील गाडले, उपसरपंच किसन पाटील ताटे, ग्राम पंचायत सदस्य मिलिंद कंधारे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ कांबळे मुगावकर, पोलीस पाटील आनंद पाटील मुगावकर, बंडू राठोड, माधव जुटूलकर, बाबाराव भालेराव, शंकर हेटे, नागेश फते, धर्माजी चिल्कावार सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर सरपंच , उपसरपंच, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पालकांनी नुतन अध्यक्ष मारोती बैलकर व उपाध्यक्ष शिवहार ताटे सह सर्व सदस्यांचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.