Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दुधनी , मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांकडे नागरिकांचे लागले लक्ष !

Admin by Admin
December 19, 2025
in राजकीय
0
दुधनी , मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांकडे नागरिकांचे लागले लक्ष !
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीने पार पडली आहे. दुधनी आणि मैंदर्गी  नगर परिषदेच्या निवडणुकीतील निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दुधनीत भाजपा की शिवसेना शिंदे गट तर मैंदर्गीत भाजपा की स्थानिक गटाची आघाडीचे वर्चस्व राहणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिनांक २१ डिसेंबर रोजी नगर परिषदेचा निवडणुकीचा निकाल लागणार असून या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 दुधनी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. दुधनी नगर परिषदेसाठी ७०. ९७ टक्के इतके मतदान झाले. दुधनी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवक पदांच्या जागांसाठी मतदान झाले. यावेळी १० हजार ९०५ मतदारांपैकी ७ हजार ७३९ मतदारानी मतदानाचा हक्क बजाविला. दुधनी नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार तर वीस नगरसेवक पदासाठी ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत ५ हजार ५५४ पुरुष मतदारांपैकी ३ हजार ९८० पुरुष मतदारानी मतदानाचा हक्क बजावीला . तसेच ५ हजार ३५०  महिला मतदारांपैकी ३ हजार ७५८ महिला मतदारानी मतदानाचा हक्क बजाविला. दुधनी नगर परिषद थेट  नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात असले तरी यात प्रामुख्याने भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल मेळकुंदे , शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे, काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेश स्वामी बाहेरमठ यांच्यात सरळ लढत होत आहे. दुधनी हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सातलिंगाप्पा म्हेत्रे यांनी दुधनी नगर परिषदेवर ५० वर्षाहून अधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम केला आहे. आता माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शंकर म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे .दुधनी मध्ये काँग्रेस पक्षाने केवळ थेट नगराध्यक्ष पदासाठीच उमेदवार उभा केला आहे. दुधनी नगर परिषदेवर म्हेत्रे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने अक्कलकोट तालुक्यातील याचा परिणाम झाला आहे. दुधनी मध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे थेट नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे तसेच दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर म्हेत्रे यांचे पुत्र प्रथमेश म्हेत्रे यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. दुधनी नगर परिषदेत सत्ता राखण्याचे आव्हान म्हेत्रे बंधूं समोर उभे आहे. भाजपा तर्फे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जेष्ठ नेते अतुल मेळकुंदे यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे केले आहे. दुधनीत एकेकाळी विरोधक सापडत नव्हता. पण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हेत्रे यांची सत्ता संपुष्टात आणत धक्का दिला होता. तेव्हापासून दुधनी मध्ये भाजपाचे प्राबल्य वाढले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. काँग्रेस पक्षाने महेश स्वामी बाहेरमठ यांना उभे करत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत आणली आहे. दुधनीत खरी लढत ही भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गटात होत आहे. यामुळे या ठिकाणच्या लढतीकडे अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुधनीत भाजपा की शिवसेना शिंदे गटाची सत्ता येणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. मैंदर्गी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात असून या ठिकाणी थेट लढत होत आहे. सदस्य पदांच्या वीस जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीत एकूण ७२. ८९ टक्के  इतके मतदान झाले आहे. एकूण १२ हजार ४६६ मतदारांपैकी ९ हजार ८७  मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ४ हजार ७०२ पुरुष तर ४ हजार ३३५ महिला मतदारानी मतदान केले आहे. मैंदर्गीत स्थानिक गटाविरोधात भाजपा यांच्यात लढत होत आहे. वास्तविक पाहता मैंदर्गी नगर परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत येथे स्थानिक गटाचे वर्चस्व राहिले आहे. या ठिकाणचे राजकारण पक्षीय स्वरूपाचे झाले नाही. आता या ठिकाणी भाजपाने स्वतंत्र उमेदवार देत स्थानिक गटांसमोर आव्हान उभे केले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली बाजारमठ या निवडणूक लढवीत आहेत. स्थानिक गटाकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवम्मा पोतेनवरू या उभ्या आहेत. मैंदर्गी येथे थेट लढत होत असल्याने मैंदर्गी नगर परिषदेच्या निकालाबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. मैंदर्गीतील मतदार हा स्थानिक गटासोबत जाणार की भाजपासोबत जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर दिनांक २१ डिसेंबर रोजी दिसणार आहे. मैंदर्गीत भाजपाने बाजी मारल्यास स्थानिक गटाचे आजपर्यंतचे राजकारण संपुष्टात येणार आहे. मैंदर्गी नगर परिषदे च्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून त्याची चर्चा सुरू आहे.
Previous Post

परंडा पंचायत समितीमध्ये भाजपा महायुतीचा झेंडा फडकणार

Next Post

२० डिसेंबर १८९६ माता भीमाबाई आंबेडकर स्मृतिदिन

Admin

Admin

Next Post
२० डिसेंबर १८९६ माता भीमाबाई आंबेडकर स्मृतिदिन

२० डिसेंबर १८९६ माता भीमाबाई आंबेडकर स्मृतिदिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697