Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करजगी येथे परमपूज्य सद्गुरु श्री १००८ मुरगेंद्र शिवाचार्य महास्वमजी यांचा लिंगऐक्य  

Admin by Admin
December 17, 2025
in सामाजिक
0
करजगी येथे परमपूज्य सद्गुरु श्री १००८ मुरगेंद्र शिवाचार्य महास्वमजी यांचा लिंगऐक्य  
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  
अक्कलकोट:-(प्रतिनिधी) 
(करजगी ता. अक्कलकोट) येथे श्री १००८ मृगेंद्र शिवाचार्य महाराज (मठसंस्थान हिरेमठ) यांच्या करजगी येथे झालेल्या लिंगैक्य अंत्यविधी व स्मरण सभेचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास श्री. श्री. श्री. १००८ ज्ञान सिंहासनाधीश विश्वराज्य शिवाचार्य महास्वामीजी १००८( काशी पीठ) श्री जंगमदेव महालिंगस्वामी, श्री. श्री. श्री. १००८ श्री जय सिद्धेश्वर महास्वामीजी (गंगामठ),श्री डॉ जय सिद्धेश्वर महास्वामीजी (गौडगाव),श्री  पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी (माळकोट),श्री म.नी.प्र. शिवानंद महास्वामीजी (करजगी) तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध मठांचे शिवाचार्य, स्वामीजी, धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी करजगी, ताडवळ, हुबळी, अक्कलकोट, सोलापूर, चंद्रपूर, बाळगाव, हिंगणी आदी गावांतील सुमारे ४० ते ५० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन व श्रद्धांजली अर्पण केली.
परमपूज्य मृगेंद्र शिवाचार्य महाराजांनी आपल्या ४२ वर्षांच्या कार्यकाळात धर्मप्रसार, समाजप्रबोधन व भक्तांमध्ये आध्यात्मिक चेतना निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी शैव परंपरेनुसार भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच धर्मसभा घेऊन उपस्थित धर्मगुरूंनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी जगद्गुरु श्री १००८ रामपुरी पीठ (बाळेकुंद्री) यांचे थेट ऑनलाइन संबोधन झाले. त्यांनी सर्व भक्तगणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शोकसंतप्तांना धीर दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करजगी येथील सर्व भक्तगण व सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Post

अक्कलकोट तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नागनळळी येथील के एस एम कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

Next Post

अक्कलकोट विधानसभेतील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासाठी दोन कोटी पंधरा लाख रुपये मंजूर 

Admin

Admin

Next Post
विवेकानंद प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमालाचे आयोजन

अक्कलकोट विधानसभेतील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासाठी दोन कोटी पंधरा लाख रुपये मंजूर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697