महाराष्ट्र
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अन्नछत्र परिवाराशी मंगेशकर कुटुंबांचे ऋणानुबंध कायम – पं. हृदयनाथ मंगेशकर

अक्कलकोट: (प्रतिनिधी)
गानसम्राज्ञी भारतरत्न आदरणीय लता दिदी नंतर ही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अन्नछत्र परिवाराशी मंगेशकर कुटुंबांचे ऋणानुबंध कायम असल्याचे मनोगत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.
ते मुंबई उपनगरातील विलेपार्ले पूर्व येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८९ व्या वर्षातील पदार्पण आणि हृदयेश आर्ट्स या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्यचे औचित्य साधून हृदयेश आर्ट्सच्या वतीने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा विशेष सत्कार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना पं. हृदयनाथ मंगेशकर हे बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण श्री व सौ डॉ. अनिल काकोडकर, विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे आमदार- पराग आळोणी, उषाताई मंगेशकर, मिनाताई खर्डीकर, आदिनाथ मंगेशकर, हृदयेश आर्ट्स चे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर, ए.बी.पी. माझा चे संपादक राजीव खांडेकर आदिजन उपस्थित होते.
जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांना हृदयनाथ अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्याने आजवरच्या जीवनप्रवाहातील दिदींच्या आठवणींना उजाळा देणारा हृदयेश आर्ट्स आयोजीत दिदी आणि मी’ हा कार्यक्रम पं. हृदयनाथ मंगेशकर व विभावरी आपटे-जोशी यांनी सदर केला.
हृदयेश आर्ट्स आयोजीत या आनंदोत्सवास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, मयुरेश पै., संतोष भोसले यांच्या सह नाशिक शिमला फूड चे शुभम नागरे, मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ओबेरॉय ट्रायडेन च्या व्यवस्थापिका- आरतीताई लिंगायत, मर्सिडीज लॅडमार्क कार ठाणे च्या विक्री व्यवस्थापिका रुपालीताई आचरेकर, प्रतापराव गांधी व परिवार श्री क्षेत्र अक्कलकोटचे बाळासाहेब कुलकर्णी-बबलादकर, शिवराज स्वामी, मैनोद्दीन कोरबू, प्रशांत शिंदे-साठे, सरफराज शेख, कुणाल भालेकर, रमेश हळसंगी, बाबुभाई शेख, संतोष माने, गोकुळ पाटील, असद फुलारी यांच्यासह बहुसंख्येने नागरिक उपस्थितीत होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक हृदयेश आर्ट्स चे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार स्मिता गवाणकर यांनी मानले.



