सामाजिक

नायगाव पंचायत समितीच्या वतीने संत ज्ञानेश्वर जयंती साजरी

 

नायगाव / नांदेड (  सय्यद अजिम नरसीकर )

श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोतर सुवर्ण जयंती महोत्सव ७५० वी जयंती सर्वत्र साजरी करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र पारित केले असल्याने नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळख आहे कारण त्यांच्या पवित्र चरणांनी ही महाराष्ट्राची माती पावन झाली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे कार्य अथांग आहे संताचे अनमोल विचार सर्वत्र रुजली जावेत आणि त्यांचे स्मरण व्हावे या उदात भावनेपोटी महाराष्ट्र शासनाने राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशा कार्यालयात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीचे औचित्य साधून सर्वत्र सप्तशतकोतर सुवर्ण जयंती महोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन तसे आदेश सर्वत्र पारित केले आहे त्या आदेशानुसार नायगाव पंचायत समिती येथे पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक टाळ मृदंग विना आणि हरिनामाच्या गजरात सायंकाळी पाच ते सात वेळेत काढून जयंती महोत्सव साजरा केला आहे यावेळी शरचंद्र महाविद्यालयाचे प्राध्यापक बालाजी गायकवाड, ग्रामसेवक  पवळे यासह पंढरी नामवाडे, रामेश्वर गायकवाड,पंचायत समितीचे कर्मचारी  ठाकूर यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button