राजकीय

अक्कलकोटच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी करा – खासदार प्रणिती शिंदे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती  शिंदे यांनी अक्कलकोट येथील जुना राजवाडा समोर झालेल्या भव्य जाहीर सभेत काँग्रेसचे अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार  अशपाक बळोरगी आणि सर्व नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेस काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून पाटील , डॉ सुवर्णा मलगोंडा , अरुण जाधव आदीसह काँग्रेस पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.
   आपल्या भाषणात खासदार प्रणिती शिंदे यांनी  मतदारांना काँग्रेस पक्षाला मनापासून साथ देण्याचे आणि नगर अध्यक्ष तसेच नगरपरिषद दोन्ही निवडणुकांत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेस सत्तेत आल्यास अक्कलकोटच्या विकासाची व्यक्तिशः जबाबदारी घेऊन स्थानिक प्रश्नांना विशेष प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर पैसा व बुलडोझर शक्तीचा गैरवापर करून निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.
या प्रसंगी अक्कलकोटमधील अनेक प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित होते. त्यांनीही अक्कलकोट नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button