सामाजिक
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सुनील बंडगर यांचे निधन , मैंदर्गी येथे अंत्यसंस्कार
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मैंदर्गी येथील सुपुत्र सुनिल बंडगर (वय ५५) यांचे सोमवार, १४ जुलै पहाटे पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सुनिल बंडगर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण व शेतकरी प्रश्नांवर सक्रियपणे कार्यरत होते. संयमी, सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन कार्यात मैंदर्गी परिसरात भक्कम घडी बसवली गेली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे..मैंदर्गी येथील हिंदू स्मशानभूमीत रात्री हजारो कार्यकर्ते , नागरिकाच्यां उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला
त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि स्थानिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला भव्य मोर्चा काढला होता. त्याप्रमाणे २००९ तसेच २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारक्षेत्रात सुनील बंडगर हे रासपकडून निवडणूक लढवली होती. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, शेतमजुर यांच्या प्रश्नावर सुनील बंडगर सातत्याने आवाज उठवत होते.
सुनील बंडगर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी यशवंत नायक जवळ शोक व्यक्त केला आहे. अक्कलकोट येथील फत्तेसिंह चौकातील साहिल पॅलेस या कार्यालयात सुनिल बंडगर यांचे पार्थिव काही काळ ठेवण्यात आले होते. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले , सचिव शामराव मोरे , माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी , माजी जि प सदस्य आनंद तानवडे , बाळासाहेब मोरे आदींसह विविध राजकीय नेत्यांनी तसेच सामाजिक शैक्षणिक , व्यापारी , पत्रकार ,प्रतिष्ठीत नागरिकांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केले.



