Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गेल्या २६ वर्षापासून अन्नछत्र मंडळाचा धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन – अभिनेते आदेश बांदेकर

Admin by Admin
July 2, 2025
in सामाजिक
0
गेल्या २६ वर्षापासून अन्नछत्र मंडळाचा धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन – अभिनेते आदेश बांदेकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ख्यातनाम अभिनेते आदेश बांदेकर यांचा “खेळ मांडियेला” कार्यक्रम
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष  अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मुळे सांस्कृतिक वारसा लाभला असून, गेल्या २६ वर्षापासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य घडत आहे, उपस्थित माता भगिनींच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून भारावलो अशी प्रतिक्रीया ख्यातनाम अभिनेते आदेश बांदेकर यांचा “खेळ मांडियेला” कार्यक्रमाच्या वेळी मनोगतातून व्यक्त केले. महाराष्ट्रभर गाजलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमासाठी महिलांची अक्षरशः झुंबड पडली होती. दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या हेतुने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष  अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मंगळवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) ह्या कार्यक्रमाने दुसरे पुष्प संपन्न झाले. याप्रसंगी आदेश बांदेकर बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल नामाने  करण्यात आली.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूरच्या डॉ.प्रगती बागल, मनोरमा मल्टीस्टेट को. ऑप. क्रे. सोसायटी, सोलापूरच्या चेअरमन- शोभा मोरे, सोलापूरच्या डॉ.रोहिणी देशपांडे, श्रीमती मल्लमा पसारे, डॉ.आसावरी पेडगावकर, श्रीमती किशोरी शहा, न्यासाचे विश्वस्त व हिरकणी संस्थेच्या- संस्थापक अध्यक्षा सौ.अलकाताई जनमेजयराजे भोसले, न्यासाचे विश्वस्त व हिरकणी संस्थेच्या – सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, न्यासाचे विश्वस्त व माजी नगराध्यक्षा- अनिता खोबरे, हिरकणी संस्थेच्या उपाध्यक्षा- रत्नमाला मचाले, न्यासाचे क्रियाशील सदस्य सरोजिनी मोरे, तृप्ती पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज  व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
याप्रसंगी लकी ड्रॉचे कुपन देण्यात येत होते. मंचावर महिलांसह विविध खेळ, गप्पा, चर्चा करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. विजेत्या महिलांना मानाच्या ५ पैठणी, २५० घड्याळ पारितोषिक म्हणून देण्यात आले. 
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने  महाराष्ट्रभर गाजत असलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ मांडियेला संपन्न झाला. शेकडो माता-भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर व कलाकार यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. यावेळी कलाकार- सोहम बांदेकर, रशिद शेख, प्रमोद शेंडगे, नंदू डेव्हीज, अश्विनी कुर्ते, सुनील कुर्ते, कुमार साळुंके, मल्हार, रोहन यांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- भाऊ कापसे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, ओंकारेश्वर उटगे, बाळासाहेब मोरे, कैलास वाडकर, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, राजु नवले, शितल जाधव, प्रशांत साठे, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.  उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले. 
चौकट :
विशेष गौरव : कु. शर्विल संतोष माळवदकर सोलापूर (क्रीडा व स्केटिंग) चा विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चौकट : 
गुणीजन गौरव  :प्रा.जयश्रीताई बिराजदार, (सी.बी.खेडगी कॉलेज अक्कलकोट), श्रीमती रत्नाबाई गुरुबसप्पा घंटे (आदर्श उद्योजिका), सिद्राम भिमशा मुली (नूतन विद्यालय पान मंगळूर), श्रीमती अलका सुभाष साळुंखे,( सेवेकरी) यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
Previous Post

भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये

Next Post

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज संत साईबाबा ह भ प कोंडीराम काका व गुरुवर्य ह भ प रामदास (शिवराज) महाराज या पालखी दिंडीचे आगमन

Admin

Admin

Next Post
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज संत साईबाबा ह भ प कोंडीराम काका व गुरुवर्य ह भ प रामदास (शिवराज) महाराज या पालखी दिंडीचे आगमन

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज संत साईबाबा ह भ प कोंडीराम काका व गुरुवर्य ह भ प रामदास (शिवराज) महाराज या पालखी दिंडीचे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697