Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसच्या नव नेतृत्वामुळे राजकीय समीकरणे बदलणार का ?

Admin by Admin
July 1, 2025
in राजकीय
0
अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसच्या नव नेतृत्वामुळे राजकीय समीकरणे बदलणार का ?

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 तिरंगी लढतीची शक्यता !
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाने नवीन नेतृत्व म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना संधी दिली असून काँग्रेस पक्षाच्या नव नेतृत्वामुळे अक्कलकोट तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ? याकडे नागरिकांचे तसेच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यात तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षाचे नव नेतृत्व मल्लिकार्जुन पाटील यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कसोटी लागणार असून त्यांना जनतेचा प्रतिसाद कसा मिळणार यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व त्यांच्या समर्थकानी नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा राजकीय पटलावर रंगली होते. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या काँग्रेस पक्षाच्या त्यागा नंतर काँग्रेस पक्षाची दयनिय अवस्था होईल अशी चर्चा अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र सुरू होती. पण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी आमदार स्वर्गीय महादेवराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष केले. तसेच काँग्रेस पक्षामध्ये माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक बळोर्गी अरुण जाधव जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार ,नितीन ननवरे सह अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री मेहत्रे यांच्यासोबत काँग्रेस पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठराविक नेतेच काँग्रेसमध्ये असल्याने याची चर्चा राजकीय पटनावर रंगली होती. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अक्कलकोट तालुक्यात दौरा केला. या दौऱ्याला काँग्रेस प्रेमी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक २६ जून रोजी अक्कलकोट शहरातील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेस पक्षाची ताकद तालुक्यात असल्याचे दिसून आले. या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास सांगलीचे खासदार विशाल पाटील कोल्हापूरचे काँग्रेस नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे सह विविध नेते मंडळींनी उपस्थिती रहात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्ता मेळाव्याला काँग्रेस प्रेमी जनतेने दिलेला प्रतिसाद पाहून उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. काँग्रेस पक्षाचे नूतन तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वावर यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आला. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. काँग्रेस पक्षाचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नवनेतृत्वामुळे राजकीय समीकरणे कितपत बदलणार हे हगामी काळात पाहणे गरजेचे आहे .अक्कलकोट तालुक्यात भाजपाविरुद्ध काँग्रेस पक्ष अशीच लढत आजपर्यंत राजकीय पटलावर झाली आहे. माजी मंत्री म्हेत्रे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशामुळे आता अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेची ताकती दिसणार आहे .आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे .राज्यातील सत्तेत भाजपासोबत शिवसेना शिंदे गट असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शिवसेना ही माजी मंत्री म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार हे सिद्ध झाले आहे.  अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणावर भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मजबूत पकड आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या नियोजनबद्ध पक्ष बांधणीमुळे भाजपाची ताकद वाढली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विकास कामांमुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची लोकप्रियता कायम राहिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा , काँग्रेस तसेच शिवसेना शिंदे गटात लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचे नव नेतृत्व मल्लिकार्जुन पाटील व पदाधिकाऱ्यांची कस लागणार आहे. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे याची ताकद आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार का ? याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे..
Previous Post

कसंतरी होतंय !

Next Post

भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये

Admin

Admin

Next Post
मानवी स्वातंत्र्य आणि डॉक्टर आंबेडकर

भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156965
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697