देश - विदेश

नाकर्त्या भाजप सरकारमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, अराजकता हिच ओरिसाची ओळख होत आहे :- खासदार प्रणिती शिंदे

 

भुवनेश्वर (ओरिसा ) -अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सत्य शोधक कमिटीच्या खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेस महासचिव दीपा दास मुंशी, खासदार रंजीत रंजन, खासदार एस. ज्योती मणि, सौ. शोभा ओझा, तसेच ओरिसा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भक्त चरण दास आणि ओरिसा राज्य महिला व बाल गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या प्रमुख यांच्या उपस्थितीत राज्यभरात सुरू असलेल्या खून, बेपत्ता होणे, अपहरण व सामूहिक बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत चर्चा झाली.

यावेळी ओरिसा प्रदेश काँग्रेस कार्यालय भुवनेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ओरिसाच्या चार दिवसीय दौऱ्यात आमच्या समोर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. भाजपचे मुख्यमंत्री आणि प्रशासन यांच्या अकार्यक्षमतेमुळे बलात्काराच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहेत. आरोपींना कसलेही भय नाही. महिला सुरक्षित नाहीत. पीडितांना न्यायापासून वंचित ठेवले जात आहे. गुन्हे लपविले जात आहेत हे चिंताजनक आहे. कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नाकर्त्या भाजप सरकारमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, आणि अराजकता ही ओरिसाची ओळख बनत आहे. याचा आम्ही निषेध करतो. आणि ही परिस्थिती बदलेल अशी आशा करतो.
या चार दिवसीय ओरिसा दौऱ्यात आमच्यासमोर आलेल्या गोष्टी आगामी संसद अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button