Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन

Admin by Admin
June 13, 2025
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
 जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने शनिवार १४ जून रोजी सकाळी ११ वा. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, याचबरोबर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, वसुंदरे ची जपणूक यासारखे कार्यक्रम हाती घेऊन अक्कलकोट सोलापूर रोड वरील दूतर्फा सुमारे २००  हुन अधिक वृक्षांची लागवड करून त्याचे वर्षभर संवर्धन करीत आहेत. 
     शनिवार १४ जून रोजी सकाळी ११ वाजता राजे फत्तेसिंह क्रीडांगण येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते तर अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तर
माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बरोबरच, मॉर्निंग ग्रुप, सुप्रभात ग्रुप सर्व पदाधिकारी व सदस्य, अमोल राजे भोसले मित्र मंडळ व लेझीम संघ, रोहित खोबरे, सौरभ मोरे यांच्यासह आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दरम्यान शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे यांनी फत्तेसिंह क्रीडांगण येथे पाहणी केली. यावेळी न्यासाचे अरविंद शिंदे, सौरभ मोरे, श्रीकांत झिपरे, गोरख माळी  आदीजन उपस्थित होते.
चौकट : 
      निसर्ग व पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. श्री राजे फत्तेसिंह क्रीडांगण परिसरात विविध सुगंधित फुलांचे झाडे लागवड करणार आहेत जेणेकरून त्या झाडांचे सुगंध परिसरात दरवळून क्रीडांगणावर येणाऱ्या नागरिकांचे मन प्रसन्न व परिसर प्रफुल्लित राहणार आहे.
Previous Post

भिम छावा संघटनेचे शावरस सिध्द हायस्कूल आंचेगाव या शाळेचा अनागोंदी  कारभाराच्या विरोधात  सोलापूर शिक्षण विभागावर निदर्शने

Next Post

अक्कलकोट शहर बस स्थानक येथील दक्षिण बाजूस पायवाट सुरू करण्याच्या मागणीला माजी गृहराज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या शिष्टाई मुळे यश

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहर बस स्थानक येथील दक्षिण बाजूस पायवाट सुरू करण्याच्या मागणीला माजी गृहराज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या शिष्टाई मुळे यश

अक्कलकोट शहर बस स्थानक येथील दक्षिण बाजूस पायवाट सुरू करण्याच्या मागणीला माजी गृहराज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या शिष्टाई मुळे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157527
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697