अक्कलकोट येथे भारतीय बौद्ध महासभातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अक्कलकोट येथे भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट शाखा तसेच राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय बागेहळी रोड येथील सभागृहात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती शनिवार दिनांक ३१ मे रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे प्रमुख तथा रिझर्व बँकेचे निवृत्त मॅनेजर सामाजिक कार्यकर्ते दिलीप कदम व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमास कॅप्टन कमलाकर कांबळे , दिलीप कदम , मल्लिकार्जुन बाचके ,निवृत्त मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे, मेजर शंभूदेव सुरवसे , श्रीशैल शिवशरण, मसाण्णा मनोरे , बसवराज सक्करगी , बागेहळळी सरपंच रवी दिलीप गायकवाड, मल्लिकार्जुन भणगे, बागेहळळी माजी सरपंच मनगेन लक्ष्मण माशाळे, श्री स्वामी समर्थ विश्राम धामचे सचिव धोंडीबा सिरसट ,माजी सरपंच बागेहळळी काशिनाथ राऊत ,बागेहल्ली माजी उपसरपंच विजयकुमार गायकवाड, प्रकाश पोटे मुख्याध्यापिका सिद्धव्वा शिवशरण, सेवानिवृत्त शिक्षक व्ही आर कुंभार पत्रकार स्वामीराव गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे , दिलीप कदम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महादेव माशाळे, सिद्धाराम दुधाळे , प्रकाश माशाळे, विठ्ठल माने, शिवशंकर गुंजले ईरेश गवळी ,आमसिद्ध पुजारी आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.