Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजलगाव शहर पोलिसांनी केले चोरांना अटक

Admin by Admin
May 30, 2025
in महाराष्ट्र
0
माजलगाव शहर पोलिसांनी केले चोरांना अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुख्य बाजार पेठेत वारंवार दुकाने फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी दिला दणका

माजलगाव / बीड ( नाजेर कुरेशी. )दि.04/05/2025 रोजी पहाटेच्या सुमारास माजलगांव शहरातील जुना मोंढा भागातील धनंजय दत्तात्रय धपाटे, रा.लवुळ नं. 1 ता. माजलगांव यांचे ज्ञानराधा मेडीकल दुकानाचे तसेच सुंदरराव सोळंके महावि‌द्यालय समोरील खान कॉम्पलेक्स मधील खुरशीद रशीद शेख यांचे सिटी नावाचे हॉटेलचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून मेडीकल व हॉटेलमधील नगदी 11,000/-रुपये व साहीत्य चोरुन नेले असल्याचे धनंजय दत्तात्रय धपाटे यांचे फिर्याद वरुन पो.स्टे. माजलगांव शहर येथे गु.र.नं. 171/2025 कलम 331 (4), 305 (A) भारतीय न्याय संहीता प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल आहे.
त्यानंतर दि.08/05/2025 रोजी पहाटेच्या सुमारास गोविंद भगवान जाधव रा.शेलापुरी ता. माजलगांव यांचे मेन रोड माजलगांव येथील सिग्नीचर नावाचे कापड दुकानाचे शटर अजात चोरट्यांनी तोडुन दुकानातील नगदी 5300/- रुपये व 15 जिन्स पेंट असा एकूण 24250/-रुपयाचा माल चोरी गेल्याने त्यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. माजलगांव शहर येथे गु.र.नं. 178/2025 कलम 331 (3), (4), 305 (A) भारतीय न्याय संहीता प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल आहे.
माजलगांव शहरांमधील मेन मार्केटमध्ये दुकाने फोडुन चोऱ्याचे सत्र सुरु झाल्याने व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु माजलगाव शहर पोलीसांनी तांत्रीकदृष्ट्या कसोशीने तपास करुन मुख्य बाजारपेठेत दुकाने फोडुन चोरी करणारे सराईत गुन्हेगार 1) सुरेश अशोक मोरे वय 30 वर्षे रा. लालबाग जालना 2) विजय कैलास खरे वय 30 वर्षे रा. कन्हैयानगर जालना 3) आमीत नंदलाल धागडीया रा. खरपुडी ता. जि. जालना 4) गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंध नगर जालना यांना निष्पन् केले असुन सदर गुन्हयामध्ये 1) सुरेश अशोक मोरे 2) विजय कैलास खरे यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन माल नगदी 11,000/-रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच नमुद आरोपीतांकडे कसोशीने तपास चालु असुन इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक के.बी.माकणे, पोहेकों/गणेश नांगरे, पोहेकॉ किशोर जाधव यांनी केली आहे.

Previous Post

मुथा नॉलेज फाउंडेशन, राज्यस्तरीय अक्षर संमेलनात सहभागी. विशेष सन्मान-ज्योती मुथा

Next Post

केंद्र सरकारने MSP त केलेली वाढ युपीए सरकारच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट : हर्षवर्धन सपकाळ

Admin

Admin

Next Post
केंद्र सरकारने MSP त केलेली वाढ युपीए सरकारच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट : हर्षवर्धन सपकाळ

केंद्र सरकारने MSP त केलेली वाढ युपीए सरकारच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट : हर्षवर्धन सपकाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697