सामाजिक
माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिकेचे प्रकाशन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोटच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2025 प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
माणुसकी फाउंडेशन चे मार्गदर्शक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले ,श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान चे चेअरमन विद्यमान नगरसेवक माजी नगराध्यक्ष महेश इंगळे ,श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अनुप पुजारी आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पार पडले.अक्कलकोट मधील माणुसकी फाऊंडेशन ही संघटना अत्यंत तळमळीने कार्य करणारी संघटना आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा, रस्त्यावरील निराधार यांना हिवाळ्यात माणुसकीची उब म्हणून मायेच्या वस्त्राचे अच्छादन, गोरगरिबाच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, दिवाळी फराळ वाटप, कोविड लॉकडाऊन काळात अन्नदान, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अन्नदान, मदत कार्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य,
इत्यादी उपक्रम अगदी उत्साहाने राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ अनेक निराधारांना गोरगरिबांना झालेला आहे. या संस्थेचे सर्व सदस्य कोणीही बेरोजगार नसून सर्व स्वयंसेवक आपले व्यवसाय व नोकरी सांभाळून या माणुसकी फाऊंडेशनचे कार्य अगदी उत्साहाने करीत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर आज नूतन वर्षाची भेट म्हणून सन २०२५ या नुतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून माणुसकी फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी ही जोपासलेली आहे.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत क्षिरसागर, उपाध्यक्ष आकाश शिंदे, आशिष हुंबे, अविनाश क्षिरसागर,देविदास गवंडी, योगेश महिंद्रकर, बाबुशा भालके आदी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते..
