महाराष्ट्र

नरसी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

 

नायगाव / नांदेड  (:- सय्यद अजिम नरसीकर )
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नरसी येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे सकाळी ११:३० वाजता सरपंच गजानन भिलवंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहन करून डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर भिलवंडे, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे नेते श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे, पोलीस पाटील इब्राहीम बेग पटेल, संभाजी भिलवंडे, रविन्द्र भिलवंडे, अलीम पटेल, गंगाधर वडगावे, सय्यद इस्माईलसाब, पत्रकार गोविद टोकलवाड, गंगाधर गंगासागरे, गणेश कंदुरके, पत्रकार सय्यद अजीम, तानाजी शेळगावकर, माधव कोरे, गजानन पवार होटाळकर उपस्थित होते.

  1. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी. दिनेश सुर्यवंशी, देवीदास सुर्यवंशी, जळबा सुर्यवंशी, खाकीबा सुर्यवंशी, गंगाधर भेदे, श्याम गायकवाड, दिगंबर सुर्यवंशी, सदाशिव सुर्यवंशी, यादव सुर्यवंशी विजय सुर्यवंशी, सम्रत सूर्यवंशी, दिलीप सुर्यवंशी ,बालाजी सुर्यवंशी,गोविंद सुर्यवंशी,बबलु सुर्यवंशी,सह गावातील नागरिक व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती मिरवणूकीत रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीधर जगताप, कुंटूरचे सपोनि रामकृष्ण श्रीहरी पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे सह हद्दीतील सर्व पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button