सामाजिक
मौन तपस्वी श्री गुरु जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या जन्मदिनानिमित्त अक्कलकोट येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )मौन तपस्वी श्री गुरु जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या ८३ व्या जन्मदिनानिमित्त अक्कलकोट येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती समाधान मेळा चे पदाधिकारी दत्तकुमार साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. समाधान मेळा ग्रुपच्या वतीने दिनांक २० मार्च रोजी सकाळी दहा वाजता अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी विरक्त मताचे प्रमुख बसवलिंग महास्वामीजी ,आमदार सचिन कल्याणशेट्टी आदींसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ सुहास माने सिव्हिल सर्जन सोलापुर डॉ अशोक राठोड नेत्र शल्य चिकित्सक डॉ नविन जिवने डॉ गणेश इंदुरकर, डॉ करजखेडे , डॉ जयश्री खिस्ते डॉ रविद्र बनसोडे, डॉ छिरसागर डॉ सुशांत अल्हट डॉ नबिलाल नदाफ, डॉ शफीया नदाफ ,नेत्र चिकित्सा अधिकारी महेश हिरेमठ , जमादार , राजु मलंग , विनायक कुलकर्णी ,दिपक बनाळे आदि वैदयकीय तज्ञ नेत्र तज्ञ मान्यवर शिबिरात सहभागी होणार आहेत.या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन समाधान मेळाचे अध्यक्ष बसवराज माशाळे सचिव कांतू धनशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला शिवकुमार कापसे ,दत्तकुमार साखरे प्रमोद लोकापुरे शेखर आडवितोटे बाळकृष्ण म्हेत्रे श्रीकांत झिपरे राजु एकबोटे ओंकार उटगे राजू मलंग अभिजित लोके आदि उपस्थित होते .



