Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट

Admin by Admin
March 14, 2025
in सामाजिक
0
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून राज्यातील धर्मादाय संस्थेतील एक अग्रगण्य संस्था असून, एकाच छताखाली महाप्रसाद सेवेबरोबरच विविध उपक्रम उल्लेखनीयरित्या राबविल्या जात असल्याचे मनोगत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
ते सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या उपस्थितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ना.चंद्रकांत पाटील हे बोलत होते. त्यांच्या समवेत सुविद्य पत्नी सौ.अंजली चंद्रकांत पाटील उपस्थित होत्या. 
ना.चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने गेल्या ३८ वर्षाच्या कालखंडात श्री स्वामी भक्तांच्या सेवेबरोबरच न्यासाकडून सुरु केलेल्या दिव्यांग व निराधारांना समर्थ महाप्रसादसेवा, शहर व तालुक्यातील कुस्तीगीरांसाठी प्रसादरुपी खुराक दिला जातो. अशा या योजना न्यास राबवीत आहे. ही बाब कौतुकास्पद असून, राज्यातील धर्मादाय संस्थांनी अन्नछत्र मंडळाचा आदर्श घेतला पाहिजे. याबरोबरच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या विकासात अन्नछत्र मंडळामुळे भर पडत असल्याचे यावेळी ना.चंद्रकांत पाटील म्हणाले.
यानंतर ना.चंद्रकांत पाटील यांनी न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर व श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे श्रींचे दर्शन घेतले. 
यावेळी न्यासाचे मोहन डांगरे, राहूल डांगरे, मल्लिनाथ स्वामी, महेश हिंडोळे, प्रदिप पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्विय सहायक धनंजय गाढवे, मल्लिकार्जुन आळगी, लखन झंपले, मनोज निकम, अरविंद शिंदे, दत्ता माने, बाळासाहेब कुलकर्णी-देसाई-बबलादकर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, आप्पा हंचाटे, पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी, रवी वाघमोडे, बालाजी कटारे, सचिन कलबुर्गी,निखील पाटील, गोटू माने, गोविंदराव शिंदे, सरफराज शेख, मैनुद्दीन कोरबू, आदींसह स्वामीभक्त , सेवेकरी वर्ग उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल

Next Post

तंत्रनिकेतन शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात श्री.वटवृक्ष देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे मोठे योगदान  – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Admin

Admin

Next Post
तंत्रनिकेतन शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात श्री.वटवृक्ष देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे मोठे योगदान  – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

तंत्रनिकेतन शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात श्री.वटवृक्ष देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे मोठे योगदान  - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157113
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697