सामाजिक

तंत्रनिकेतन शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात श्री.वटवृक्ष देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे मोठे योगदान  – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे अक्कलकोट तालुक्यातील तंत्र निकेतन शिक्षण प्रणालीत मोठे योगदान आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने येथील कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात अनेक गरजू विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची सोय तालुक्यातच मिळत असल्याने तंत्र शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांची मोठी सोय झालेली आहे. आज सोलापूर पुणे, मुंबईच्या धरतीवरील तंत्र शिक्षण इंगळे परिवार यांच्यामुळे अक्कलकोट मध्ये उपलब्ध आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने व महेश इंगळे यांच्या सेवाभावी वृत्तीने हे तंत्रनिकेतन महाविद्यालय यशस्वीपणे विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत आहे, त्यामुळे अक्कलकोट सारख्या ग्रामीण परिसरातील कानाकोपऱ्यात या कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रशिक्षण पोहोचविण्याबाबत कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादनीय मनोगत भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सपत्निक भेट देऊन श्री. स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील यांचा मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्री.स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या शैक्षणिक धोरणांना व उपक्रमांना स्वामी समर्थांची सेवा या उदात्त हेतूने नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे मनोगत ही व्यक्त केले. या प्रसंगी आमदार सचिन  कल्याणशेट्टी,  स्वीय सहायक धनंजय गाढवे, प्रथमेश इंगळे, महेश हिंडोळे, प्रदिप पाटील, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, रवी वाघमोडे, लखन झंपले, बाळासाहेब कुलकर्णी, उद्योगपती विलास कोरे, बालाजी कटारे, सरफराज शेख, मैनुद्दीन कोरबू,  मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुरेश वाले, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ आदींसह देवस्थानचे अन्य सेवेकरी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button