बाळासाहेब भवन मुंबई येथे ग्रंथालय कोर कमिटी मीटिंग संपन्न

मुंबई – महाराष्ट्र ग्रंथालय सेल शिवसेना कोर कमिटीचे मीटिंग बाळासाहेब भवन मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत पलाडे साहेब यांच्या उपस्थितीत दिनांक 10 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. महाराष्ट्रातील ग्रंथालय शिवसेना मेळावा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील ,उद्योग मंत्री उदय सामंत ,शिक्षण मंत्री मिलिंद जी के सरकार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मेळावा होणार असून यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बाळासाहेब भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगीत प्रशांत पलाडे संपर्क प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली या प्रामुख्याने या राज्याचे ग्रंथालयाचे अध्यक्ष बी जी देशमुख ,राज्यसचिव पी एम पाटील ,रंजीत सूर्यवंशी संभाजी नगर,नाशिक येथील रवींद्र सानप ,मुंबई येथील युवराज खरात,मीरा-भाईंदर येथील जितूभाई शहा उपस्थित होते. महाराष्ट्रातील ग्रंथालय संदर्भात विविध प्रश्नांवर चर्चा विनिमय होऊन लवकरच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.