नरसीत अपंग निवासी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

नायगाव / नांदेड : – ( सय्यद अजिम नरसीकर )नरसी येथील अपंग निवासी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली. प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीधर जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मागील पंधरा वर्षांपासून डेबुजी फोर्सचे प्रदेश अध्यक्ष कैलास तेलंग टेंभुर्णीकर हे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी वर्षी वेगवेगळ्या शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन, खाउ, वाटप करून जयंती साजरी करत असतात आज दि. २३ फेब्रुवारी रोजी रविवारी नरसी येथील अपंग निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना पेन, वही, खाऊ, वाटप करून जयंती साजरी केली.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्रावर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीधर जगताप, कैलास तेलंग टेंभुर्णीकर, गंगाधर गंगासागरे, सह अनेकांनी विचार मांडले. यावेळी जेष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, गोविंद नरसीकर, तानाजी शेळगावकर, गणेश कंदुरके व शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.