राजकीय

रेखा बनसोडे शेळगावकर यांचा अनेक महिला सह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

नायगाव / नांदेड (:- सय्यद अजिम नरसीकर )

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी असलेल्या रेखाताई बनसोडे शेळगावकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटात अनेक महिला सह नायगाव येथील नुकत्याच संपन्न झालेल्या पक्षप्रवेश सोहळा व सभासद नोंदणी या कार्यक्रमात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, शिवराज पाटील होटाळकर, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक संघटनेत स्वतःला झोकून अविरतपणे गोरगरीब लोकांची निसीम सेवा रेखा बनसोडे शेळगावकर यांनी केली. गरजूंना हात दिल्या नंतर ती माणसं अशांना आपल्या हृदयात स्थान देतात या पद्धतीने रेखा बनसोडे यांचे काम तळागाळातील लोकांसाठी होते व आहे यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये काम केले त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदांची धुरा यशस्वीरित्या सांभाळली त्यांचे राजकारणातील कामकमी पण सामाजिक काम मोठे असल्याने त्यांच्या सामाजिक कामामुळे त्यांना असंख्यजनाचा मोठा परिचय आहे. नांदेड जिल्ह्यात रेखा बनसोडे शेळगावकर यांच्या संघटनामुळे चांगलीच मजबुतीकरण होईल असे सध्या तरी दिसून येते नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे वजनदार नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रेखा बनसोडे यासह चौत्राबाई भालेराव, कमलबाई दासवाड,शिल्पा गायकवाड, मंगलबाई भालेराव, सावित्राबाई दासवाड,शोभाताई दिवडे, अश्विनी भालेराव, गंगाबाई भालेराव, पद्मिनी भालेराव,अनिता देवकर, कमलबाई गवाले, राधाबाई भालेराव, गंगाबाई सूर्यवंशी, पूजा भालके या महिला सह अनेक महिलांनी प्रवेश केल्यामुळे आमदार चिखलीकर यांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिले.रेखा बनसोडे शेळगावकर यांना वरिष्ठ पदावर राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांनी नियुक्ती करावी असे त्यांच्या हितचिंतक महिलातून बोलले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button