शैक्षणिक

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संस्थापक कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी

अक्कलकोट: ( प्रतिनिधी ) 
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय,मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संकुलात कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, प्रशालेचे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    प्रारंभी कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना स्वामी यांनी म्हणाले, सरानी सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन, बिकट परिस्थितीत स्वतःबरोबर भावांचेही शिक्षण पूर्ण केले आणि प्रतिकूल परिस्थितीत महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेची स्थापना करून अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सुरू केले. कल्याणशेट्टी सरांनी  जिद्द, चिकाटी व कष्टाने संस्था वाढवली, आज या शिक्षण संकुलात शिशु वर्गापासून पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. या संस्थेतून शिक्षण घेऊन आज अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत.
   या कार्यक्रमास प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, सेमी विभागाचे दिगंबर जगताप, पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे, राजकुमार गवळी, पूजा कडबगावकर, स्वप्नाली जमदाडे, श्रीदेवी मायनाळे, सिद्रामप्पा पाटील, रवीकिरण दंतकाळे, सागर मठदेवरू, निशिगंधा कोळी, विद्या बिराजदार आदी शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button