सामाजिक
अक्कलकोटच्या शोभायात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्य, मुस्लिम बांधवांकडून पुष्पगुच्छ व पाण्याचे बॉटल देऊन शोभायात्रेचं स्वागत!

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरात दि.३० मार्च २०२५ वार रविवार रोजी गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती, हि शोभायात्रा अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे आल्यावर अक्कलकोट मुस्लिम समाजातर्फे
शोभायात्रेतील प्रमुख मंडळींना माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर,अशपाक बरोळगी, नुर शेरिकर, तडमुड, इरफान दावणा यांनी पुष्पगुच्छ व पाणी बॉटल देऊन स्वागत केले व सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिल.
या वेळी अशपाक बळोरगी,नुर शेरिकर, सद्दाम शेरीकर ,तडमुड ,इरफान दावणा,शूकुर शेख, रफिक पठाण, मुर्तुज बाजे, वलीअहमद कुरेशी,सोहेल फरास(सामाजिक कार्यकर्ता), हुसेन बळोरगी,एस एम सोशल ग्रूप चे कार्यकर्ते व मुस्लीम बांधव उपस्थित होते.