राजकीय
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कामगार सेनेकडून सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्हा व अक्कलकोट तालुका शिवसेना कामगार सेनेकडून
ठाणे येथे शिवसेनेचे खासदार संसद रत्न डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. खासदार श्रीकांत शिंदे यांचा शाल, श्री स्वामी समर्थांची प्रतिमा फोटो देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी अक्कलकोट कामगार सेना तालुका अध्यक्ष स्वामीनाथ हेगडे शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली हावनूर कामगार सेना जिल्हाप्रमुख साहेबांन्ना तेगेळी व सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
