प्रा.हणमंत हांडे यांनी रेखाटलेले भव्य चित्र प्रदर्शन

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )नायगाव शहरातील शरदचंद्र महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुखचे प्रा.हनुमंत हांडे यांनी देश विदेशातील नामांकित व्यक्ती, राजकीय,बॉलीवूड,थोर विचारवंत,साहित्यिक,कवी, गायक यांचे पेन्सिल स्केचने हुबेहूब असे जवळपास 200 चित्र रेखाटलेल्या चित्र प्रतिमेचे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ.शंकर विभुते यांच्या हस्ते तर शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. हरिबाबु, प्रोफेसर बलभीम वाघमारे,उपप्राचार्य एच एम पाटील,प्रोफेसर श्रीरंग वट्टमवार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राध्यापक हनुमंत हांडे यांना गेल्या अनेक वर्षांपासून हस्तकलेची आवड असल्याने त्यांनी तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे राहत असताना आपल्या अंगातील सुप्त गुणामुळे त्यांनी गावातील सर्व भिंती बोलक्या केल्या होत्या, आपला छंद त्यांनी पुढे नेत पेन्सिलने पांढऱ्या ड्रॉईंग कागदवर जगातील थोर विचारवंत कार्ल मार्क्स, लेनिन, अब्राहम लिंकन या जगप्रसिद्ध विचारवंतसह देशातील राष्ट्र महापुरुष महात्मा बसवेश्वर, छ.शिवाजी महाराज, महाराणी अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, राजर्षी शाहू महाराज, मुक्ता साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यासह राजकीय नेते मंडळी व पार्श्वगायिका लता मंगेशकर महान गायक मोहम्मद अजीज अभिनेता नाना पाटेकर या कलावंतासह पु ल देशपांडे प्र.के. अत्रे, मंगेश पाडगावकर, बहिणाबाई चौधरी अशा सर्व क्षेत्रातील जवळपास दोनशे प्रतिमेचे चित्र रेखाटून त्या प्रतिमेच्या बाजूला त्यांचा अल्पशा परिचय देखील दाखवण्यात आला.शरदचंद्र महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या भव्य चित्र प्रदर्शन व व्याख्यान हा कार्यक्रमांचे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आयोजन केले होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हनुमंत हांडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले प्रारंभी प्रस्तावना डॉ.गो.रा.परडे यांनी मांडली तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा.बालाजी गायकवाड यांनी तर आभार प्रा.वृंदावन नामवाडे यांनी मानले यावेळी कार्यालयीन अधीक्षक प्रशांत बिलवणीकर, प्रा.संजय भालेराव, डॉ. एम एम शिंदे, डॉ. शैलेश कांबळे यासह अनेकांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. शितल जोडवाड,कु. प्रतीक्षा गिरी,कु. तेजश्री कानोले,कु. वैष्णवी गिरी या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले आहे.
चौकट –
दिल्ली येथील येत्या 21 ते 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे प्रा. हनुमंत हांडे यांनी रेखाटलेले चित्र प्रदर्शन भरविण्यास आयोजकाची परवानगी मिळालेले अर्ज प्राप्त झाले आहे.